‘गद्दारी करून मिळवलेली सत्ता…’, भाजप नेत्याची ठाकरेंवर टीका
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आजपासून विदर्भ दौऱ्यावर होते. ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजपकडून चौफेर टीका करण्यात येत आहे. तिकडे राणा दाम्पत्याने ठाकरेंचा बेडूक असा उल्लेख करून टीका केली होती. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील ठाकरेंवर टीका केली.
ADVERTISEMENT
Maharashtra Latest Political News : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आजपासून विदर्भ दौऱ्यावर होते. ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजपकडून चौफेर टीका करण्यात येत आहे. तिकडे राणा दाम्पत्याने ठाकरेंचा बेडूक असा उल्लेख करून टीका केली होती. त्यात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील ठाकरेंवर टीका केली. खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे, पण ठाकरेंच्या खोट्या शपथांना जनता बळी पडणार नाही, अशी टीका आता बावनकुळे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विट करून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अमित शहांसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तोंडातून चकार शब्द काढला नाहीत असा थेट सवालच बावनकुळे यांनी ठाकरेंना केला. युती करताना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य केलंत आणि निवडणुकीनंतर शरद पवारांचा हात धरून भाजपसोबत गद्दारी केली, अशी टीका देखील बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली. युतीतून मतदान मागितलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही, असा हल्लाबोल देखील बावनकुळे यांनी केला.
हे ही वाचा :नवनीत राणा उद्धव ठाकरेंना म्हणाल्या बेडूक,अमरावतीत कार्यकर्त्यांचा राडा
खोटं बोल पण रेटून बोल हा @uddhavthackeray यांचा स्वभाव आहे. @AmitShah भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर @narendramodi जी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत @Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही.
युती करताना…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 9, 2023
हे वाचलं का?
तसेच शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलंच अशी टीका देखील बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली. खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला आहे. त्यामुळे जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही, अशी टीका बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली.
हे ही वाचा :‘पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो…’, उद्धव ठाकरेंचं पुन्हा अमित शाहांकडे बोट
राणा दाम्पत्याची टीका
अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना विदर्भातील लोकांना तोंड दाखवले नव्हते. आणि आता पाऊस सुरु झाला आणि बेडूक बाहेर पडले, अशी टीका नवनीत राणा यांनी ठाकरेंवर केली. आमदार रवी राणा यांनी देखील ठाकरेंवर निषाणा साधला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विदर्भात तोंड दाखवलं नाही. कोरोना काळात कधी मंत्रालयात गेले नाही.आणि आज विदर्भात पावसाळी बेडका सारखं येऊन मताची भिक मागत आहे,अशी टीका रवी राणा यांनी केली होती. राणा दाम्पत्यांच्या या टीकेनंतर ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. आणि या आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा कार्यक्रमाचे बॅनर फाडले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT