नितीश कुमारांचा महाराष्ट्रात मोठा धक्का! नेत्याने सोडली साथ, काढणार नवा पक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

 kapil patil announced new political party
janata jal united kapil patil announced new political party
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील जेडीयूचं अस्तित्व संपुष्टात

point

कपिल पाटलांनी नितीश कुमारांची सोडली साथ

Kapil Pati: भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी  (India Alliance) तयार होत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र इंडियाचा हात सोडून ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यांच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीची एक बाजून खिळखिळी झाली. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या या निर्णयामुळे काँग्रेससह (Congress) देशातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तर त्यांच्या पक्षातीलही काही नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत नितीश कुमारांवर टीका केली.

ADVERTISEMENT

नव्या पक्षाची घोषणा

नितीश कुमारांच्या या निर्णयाचे ठळक पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहे, ते म्हणजे त्यांच्यावरील नाराजगी आमदार कपिल पाटील यांनी बोलून दाखवत त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तर दुसरीकडे ते आता आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव असलेल्या आमदार कपिल पाटील यांना नितीश कुमार यांचा निर्णय पसंद पडला नाही. राज्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील जे पक्ष आहेत, त्या पुरोगामी राजकीय पक्षांनी भाजपसोबत जाऊ नये असं त्यांचे स्पष्ट मत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Nitin Gadkari : भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचं नाव का नाही?

 त्यामुळे कपिल पाटील यांनी नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे तात्काळ निर्णय घेत त्यानी जेडीयूला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. 

आमदार कपिल पाटील यांनी फक्त जेडीयूला सोडण्याचाच निर्णय घेतला नाही तर त्यांनी आता नव्या पक्षाची घोषणा करणार असंही त्यांनी स्पष्ट केले. 

ADVERTISEMENT

इंडिया आघाडीसोबत राहणार

कपिल पाटील यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार असं स्पष्ट केल्याने आता राज्यातील जेडीयूचे अस्तित्व संपणार असल्याचेच स्पष्ट झाले आहे. त्यांनी या निर्णयाबरोबच आपण इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्यानंतर त्यांच्या त्या निर्णयामुळे आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचे कपिल पाटील यांनी जाहीर केले होते. 

त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण त्यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तर त्यानंतर शरद पवार यांनीही त्यांना भेटायला बोलवलं होते, त्यावेळीही त्यांनी आपण या दोन माणसांसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते.

हे ही वाचा >> 'अब की बार भाजप तडीपार', ठाकरेंनी दिला नवा नारा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT