India Rally Delhi Live : विरोधकांचा दिल्लीतून एल्गार; ठाकरे, पवार काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये काय केले भाषण?
उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये काय केले भाषण?
social share
google news

Loktantra Bachao rally in Delhi's Ramlila Maidan : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या अटकेनंतर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. इंडिया आघाडीची लोकशाही वाचवा रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात हुंकार दिला. यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले "एक देश आणि एका व्यक्तीचे सरकार देशासाठी घातक होईल. हा देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, हा केवळ संशय नसून वस्तुस्थिती आहे. दोन बहिणी हिंमतीने लढत असतील तर भाऊ कसे मागे राहतील. मला सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन यांना सांगायचे आहे की, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. मी भाजपला त्यांच्या बॅनरवर लिहिण्याचे आव्हान देतो - आमचे तीन सहयोगी ED-CBI-Income Tax आहेत. आता भारतात आघाडीचे सरकार आणण्याची वेळ आली आहे. आम्ही लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी येथे आहोत. " होय, यांनी अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात टाकले." 

पहा इंडिया आघाडी रॅली लाईव्ह

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT