'त्या' महिलांच्या खात्यातही पैसे जमा होतील; 3 हजार कोटींचं वाटप केल्यानंतर CM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहिण योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद केलीय?

point

३ हजार कोटी रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले, शिंदेंची माहिती

point

"ही योजना एका दिवसात झाली नाही, मी आणि देवेंद्रजींनी..."

CM Eknath Shinde Speech : "कालच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला आहे. गेल्या तीन दिवसात एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. सरकारकडून आतापर्यंत तीन हजार कोटींचं वाटप झालं. तीन हजार कोटी बहिणींच्या खात्यात जमा झाले. गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली, साडेपाच लाखांचं टार्गेट पूर्ण झालंय. ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत. यामध्ये काही त्रुटी पूर्ण झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. आपल्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षात ३५ हजार कोटींची तरतूद सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी ठेवली आहे", असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात साताऱ्यात बोलत होते. (The Chief Minister's beloved sister scheme was launched yesterday. In the last three days, money has been deposited in the accounts of one crore women. Three thousand crores have been allocated by the government so far. Three thousand crores were deposited in the account of the sisters)

ADVERTISEMENT

रक्षाबंधन उद्या आहे. पण आजच इथं माझ्या लाडक्या बहिणींचा मायेचा महासागर उसाळला आहे. आमच्या हातावर राखी बांधण्यासाठी हजारो बहिणी इथं जमल्या आहेत. म्हणूनच आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपल्यासारख्या बहिणी आपल्याला मिळाल्या. मी आपल्यासमोर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना मनापासून वंदन करतो. माझी सख्खी लाडकी बहीण एक आहे. पण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लाडक्या तमाम बहीणी मला भेटल्या. त्यांच्याशी संवाद साधता आला. १५ ऑगस्ट मी माझ्या बहिणींसोबत साजरा केला. तेव्हा अनेक बहिणींनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. 

हे ही वाचा >> Supriya Sule : "राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला, तर..."; सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारला दिला इशारा

"ही योजना एका दिवसात झाली नाही, मी आणि देवेंद्रजींनी..."

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शिंदे पुढे म्हणाले, ही योजना एका दिवसात झाली नाही, मी आणि देवेंद्रजी आम्ही दोघं सरकारमध्ये आलो. शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ आहेत, या सर्वांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला. त्यावेळी देवेंद्रजी अर्थमंत्री होते. त्यांनी मी सांगितलं, या योजना आपल्याला करायच्या आहेत. ते म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. योजना सुचवा. पैसे देण्याचं काम मी करणार.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>  MHADA lottery 2024 : म्हाडाचं घर खरेदी करायचंय? ऑनलाईन प्रक्रिया माहितीय का? म्हाडाचं प्रसिद्धीपत्रक एकदा वाचाच

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा मुख्यमंत्री आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाहीत. पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड आणि तीन हजारची किंमत कळणार नाही. माझ्या घरातल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना त्याची किंमत आहे. म्हणूनच ही योजना आपल्या आशीर्वादाने यशस्वी झाली आहे. आम्ही आता दीड हजार रुपयांनी ही योजना सुरु केली आहे. देशात महाराष्ट्र बलवन राज्य आहे, असंही शिंदे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT