Supriya Sule : "राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला, तर..."; सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारला दिला इशारा
Supriya Sule Speech : पोलीस यंत्रणेचा गैरवापर या जिल्ह्यात होतोय. ही माझ्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे. जो मला व्यासपीठावर भेटला, त्याने प्रत्येक जणाने मला सांगितलंय की, पोलिसांची दहशत आहे. पोलीस आम्हाला कोणता ना कोणता त्रास देतात. तो त्रास पोलीस देत नाहीत. पोलिसांच्या मागची यंत्रणा देत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

खासदार सुप्रिया सुळेंनी महायुतील सरकारला दिला 'हा' इशारा

"धुळ्यातील कोणत्याही कुटुंबाला त्रास दिला, तर..."

सुप्रिया सुळेंनी भाजपला कठोर शब्दात सुनावलं, नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule Speech : पोलीस यंत्रणेचा गैरवापर या जिल्ह्यात होतोय. ही माझ्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे. जो मला व्यासपीठावर भेटला, त्याने प्रत्येक जणाने मला सांगितलंय की, पोलिसांची दहशत आहे. पोलीस आम्हाला कोणता ना कोणता त्रास देतात. तो त्रास पोलीस देत नाहीत. पोलिसांच्या मागची यंत्रणा देत आहे. हे सांगायचं आहे. त्यामुळे पोलिसांची त्यात काही चूक नाही. ते बिचारे पोलीस काय करतील, त्यांची मधल्या मध्ये अडचण होत आहे. पण मी तुम्हाला शब्द देते, सत्ता असूदे किंवा नसूदे, महाराष्ट्र कुणाच्या मनमानीनं चालत नाही. महाराष्ट्र हा लोकशाही पद्धतीने संविधानाने चालणारा आहे. कोणीही या राज्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला, तर त्याचं काय करायचं, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. सत्ता येते आणि जाते, ती कुणाच्याही घरात कायमची नसते, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. त्या धुळ्यातील महिला मेळाव्यात बोलत होत्या.
"धुळ्यातील कोणत्याही कुटुंबाला त्रास दिला, तर..."
सुप्रिया सुळे विरोधकांवर टीका करत म्हणाल्या, सत्ता,यश, पैसा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि जातो. ते कायमचं नसतं. त्यामुळे या भ्रमात तुम्ही आहात. सुधारायला अजूनही दोन तीन महिने आहेत. त्यामुळे सुधारण्याचा प्रयत्न करा, सुधारलात तर आनंदच आहे. तुम्ही सुधारला नाहीत, जर तुम्ही धुळ्यातील कोणत्याही कुटुंबाला त्रास दिला, तर इथून करारा जवाब डबलमध्ये मिळले, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण भारतीय जनता पक्षासारख गलिच्छ राजकारण आम्ही करत नाही. पोलिसांचा वापर करून दहशत निर्माण करण्याची जी संस्कृती आहे, ही दुर्दैवाने नवीन भाजपची आहे.
हे ही वाचा >> MHADA lottery 2024 : म्हाडाचं घर खरेदी करायचंय? ऑनलाईन प्रक्रिया माहितीय का? म्हाडाचं प्रसिद्धीपत्रक एकदा वाचाच
"सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवण्याचं काम"
जुना भारतीय जनता पक्ष नव्हता. महिला भारतीय जनता पक्ष सुसंस्कृत लोकांचा होता. नवीन भारतीय जनता पक्ष २.० निघाला आहे, त्याचा हा प्रॉब्लेम झाला आहे. सत्तेचा गैरवापर करून लोकांना भीती दाखवण्याचं काम ते करत आहे. कुणावर आयकर विभागाची, ईडी, सीबीआयची नोटिस पाठवायची. पाच वर्षांपूर्वी कुणाला ईडी माहित होती का? जर काही चुकीचं केलं की ईडी लागते. जास्त राजकीय केलं की ईडी लागते. जे घाबरतात ते तिकडे वॉशिंग मशिनमध्ये जातात. जे लढतात त्यांना ते जेलमध्ये टाकतात.
हे ही वाचा >> Ajit Pawar: सुप्रिया सुळेंना राखी बांधणार का? अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत जेलमध्ये गेले. अनिल देशमुख जेलमध्ये गेले. नवाब मलिकांनाही जेलमध्ये टाकलं. नवाब मलिक आमच्यासोबत नसले तरीही आम्हाला हरकत नाही. आम्हाला दु:ख वाटतं. त्यांच्या सगळ्या संघर्षाच्या काळात भाजप त्यांना दूर करत होतं, तेव्हा सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या बाजूने बोलल्या होत्या. लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या होत्या का? लोकसभेनंतरच त्यांना बहिणी आठवल्या आहेत. तोपर्यंत त्यांना काहीच प्रेम नव्हतं. त्यामुळे लाडकी बहीण योजना लोकसभेनंतरच आली, असंही सुळे म्हणाल्या.