जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं आंदोलन, पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "हे लोक तंबाखू मळून..."

मुंबई तक

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar : जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, पोलीस आव्हाडांच्या कार्यकर्त्यालाच घेऊन जात असताना दिसत आहेत. यामुळे आता आव्हाडांनी ठिय्या आंदोलन करत पोलिसांवर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जितेंद्र आव्हाड णि गोपीचंद पडळकर या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

point

मध्यरात्री आव्हाडांनी पोलिसांच्या गाडीसमोर केलं ठिय्या आंदोलन

point

नेमकं रात्री काय घडलं?

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये (17 जुलै) रोजी राडा झाला होता. या राड्यात दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे एकमेकांसोबत भिडले होते. जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. दरम्यान, पोलीस आव्हाडांच्या कार्यकर्त्यालाच घेऊन जात असताना दिसत आहेत. यामुळे आता आव्हाडांनी ठिय्या आंदोलन करत पोलिसांवर आरोप केले आहेत.

हेही वाचा : गोपीचंद पडळकरांच्या समोरच नितीन देशमुखांना मारहाण झाली, 'तो' Inside Video आला समोर

नेमकं काय झालं? 

मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर बसून राहिले आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी केली. ते एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवलं आहे. पोलीस प्रशासनाने माझ्या कार्यकर्त्याला मारहाण करूनही त्याला ताब्यात घेतलेलं आहे. हे चार ते पाच लोक येऊन मारहाण करत होते. त्यांच्यात कार्यकर्त्यांना का ताब्यात घेण्यात आलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी रोहित पवारही त्या ठिकाणी उपस्थित होते, अशी माहिती आता समोर आली आहे. 

आव्हाडांचे पोलिसांवर आरोप 

मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर आव्हाड म्हणाले की, पोलिसांनी नितीन देशमुख या माझ्या कार्यकर्त्याला घेऊन जात होते, असा पोलिसांवर आरोप करत आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी आडवली. त्यानंतर त्यांनी आंदोलास करण्यास सुरुवात केली. यावेळी आव्हाडांनी आरोप केला की, मारहाण करणाऱ्यांना पोलीस प्रशान पाठराखण करत आहेत आणि त्यांना वडापाव, तंबाखू मळून देताना दिसतात, तर ज्याने मार खाल्लाय त्याला अटक करण्यात आलेली आहे. आमच्याकडे याचे सर्व व्हिडिओ आहेत, अशी माहिती आता समोर आलेली आहे. 

आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात आणि पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली. मध्यरात्री सुमारे एक तासभर हा राडा सुरू होता. यावेळी रोहित पवारही घटनास्थळी दाखल झाले होते. 

हेही वाचा : ग्रहण दोष योग लागू झाल्याने 'या' राशीतील लोकांना आर्थिक चणचण भासेल, तुमच्याही राशीचा समावेश आहे का?

या घटनेमुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा ढाशलता चालला आहे का? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे, तसेच आव्हाडांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केलेत आणि टीका केली आहे, या घटनेनं राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp