मृत व्यक्तीला जिवंत दाखवून माजी नगरसेवकाने भूखंड ढापला, नुकताच शेकाप सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश
Panvel News : विशेष म्हणजे, सुनील बहिरा यांनी अलीकडेच शेकापचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे नाव या मोठ्या जमीन गैरव्यवहारात समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मृत व्यक्तीला जिवंत दाखवून माजी नगरसेवकाने भूखंड ढापला
नुकताच शेकाप सोडून भाजपमध्ये केला होता प्रवेश
Panvel News : पनवेलमध्ये सिडकोच्या जमिनीवर झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह 12 जणांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे भासवून 11000 चौरस मीटरचा मौल्यवान भूखंड मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. सिडकोने सविस्तर तपास करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना तक्का गावातील बहिरा कुटुंबाशी संबंधित आहे. विष्णू बहिरा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सिडकोकडून संपादित जमिनीच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाला भूखंड मिळणार होता. मात्र, या भूखंडावर डोळा ठेवून काही जणांनी एकत्र येऊन फसवणुकीची योजना आखल्याचा आरोप सिडकोने केला आहे.
तपासात असे उघड झाले की, विष्णू बहिरा मृत असल्याचे माहित असूनही त्यांच्या नावे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. या ओळखपत्रावर विष्णू बहिरा यांचा फोटो न लावता सखाराम ढवळे यांचा फोटो बसवण्यात आला. ढवळे यांनाच विष्णू बहिरा असल्याचे भासवून विविध सरकारी कार्यालयांत कागदपत्रे सादर करण्यात आली. इतकेच नव्हे तर स्वाक्षऱ्याही ढवळे यांच्या घेतल्या गेल्या, ज्यामुळे सिडकोकडून मिळणाऱ्या 1100 चौरस मीटरच्या भूखंडावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न झाला.










