'जिन्नांच्या दबावाखाली काँग्रेसची शरणागती', वंदे मातरम गीतावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य
Narendra Modi : वंदे मातरम् गीतावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. जिन्नांनीच वंदे मातरम या गीताचा विरोध केल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वंदे मातरम् गीतावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
8 डिसेंबर रोजी संसदेत हिवाळी अधिवेशनात काय घडलं?
Narendra Modi : 'जिन्नांनी 1937 साली वंदे मातरम् या गीताचा विरोध केला होता. जवाहरलाल नेहरूंना वाटले की, त्यांची खुर्ची कुठेतरी धोक्यात आहे. मुस्लिम लीगने कसलाही आधार न घेता केलेल्या विधानांवरून त्यांनी वंदे मातरमची चौकशी केली. थोडक्यात काय तर जिन्नांच्याच दबावाखाली काँग्रेसने वंदे भारत या गीतावरून शरणांगती पत्करली होती', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 डिसेंबर रोजी संसदेत हिवाळी अधिवेशनात त्यांनी वक्तव्य केलं होतं.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात करिअर आणि संपत्तीत लक्षणीय बदल होणार, काय सांगतं राशीभविष्य?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
नरेंद्र मोदी म्हणाले की, 'आजही 15 आणि 26 जानेवारी रोजी, राष्ट्रध्वजाबद्दल चर्चा होताना दिसते. अशातच देशभक्ती आणि वंदे मातरमच्या भावना सर्वत्र दिसून येते. वंदे मातरम् हे केवळ एक गीत किंवा भावना नसून ती एक प्रेरणा आहे. आपल्या राष्ट्रासाठीचं एक प्रेरणादायी गीत आहे. गांधीजींनी व्यक्त केलेली भावना आजही अस्तित्वात आहे. ही भावना आजही आपल्याला एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.'
'... तर मुस्लिमांना राग अनावर होईल'
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, 'मी वंदे मातरम् गीताच्या पार्श्वभूमीबाबत वाचलेलं आहे. मला वाटते की, याबाबत मुस्लिमांना राग अनावर होईल. नंतर काँग्रेस पक्षाचे एक निवेदन जारी करण्यात आले होते, ज्यात वंदे मातरमच्या वापराचा एकूण आढावा घेण्यात आला होता. नंतर त्यांनी जिन्ना यांनी वंदे मातरम् या गीताचा विरोध केल्याचं सांगितलं'.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे चित्रा वाघ यांच्यावर 'ते' ट्वीट डिलीट करण्याची वेळ
'नेहरूंची खुर्ची धोक्यात होती...' नरेंद्र मोदी काय म्हणाले?
मोदी म्हणाले की, 'जिन्नांनी 1937 साली या गीताचा विरोध केला होता. जवाहरलाल नेहरूंना वाटले की, त्यांची खुर्ची कुठेतरी धोक्यात आहे. मुस्लिम लीगने कसलाही आधार न घेता केलेल्या विधानांवरून त्यांनी वंदे मातरमची चौकशी केली. अशातच जिन्नांच्या निषेधार्थ नेहरूंनी नेताजींना एक पत्र लिहिलं होतं. पत्रात, नेहरू जिन्नांच्या भावनांशी कुठेतरी सहमत असल्याचे दिसून आले', असे नरेंद्र मोदी म्हणालेत. वंदे मातरम् या गीताबाबत आपण आपल्या नवीन पिढ्यांना त्या परिस्थितीबाबत सांगायला हवे असल्याचं नरेंद्र मोदी म्हणालेत.










