देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे चित्रा वाघ यांच्यावर 'ते' ट्वीट डिलीट करण्याची वेळ

मुंबई तक

Chitra Wagh deletes tweet : खास शिलेदारांसाठी समृद्धी महामार्गावरुन येण्यासाठी गाडी का पाठवून देत नाहीत? असा सवाल विचारला जाऊ शकतो.

ADVERTISEMENT

Chitra Wagh deletes tweet
Chitra Wagh deletes tweet
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली पण..

point

चित्रा वाघ यांच्यावर 'ते' ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली

Chitra Wagh deletes tweet : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांच्यावर पोस्ट डिलीट करण्याची वेळ आलीय. सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चित्रा वाघ यांनी काही मिनीटातच डिलीट करुन टाकली. पण ही वेळ का आली, नेमकं काय झालं ते सुरुवातीपासून जाणून घेऊयात.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना काय म्हटलं होतं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. माध्यमांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना उद्धव ठाकरे आणि इंडिगोवरुन प्रश्न विचारला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. " उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्याला यायला काही अडचणी नाहीत. आणि जर तेही नको वाटलं तर,शिंदेसाहेबांनी आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे. वाटलं तर गाडी पाठवून देतो", असे चिमटे काढत फडणवीसांनी ठाकरेंच्या प्रायव्हेट जेटमधून येण्यावरुन टीका केली.

हेही वाचा : राज्यातील 38 कारखान्यानी एफआरपीचे 140 कोटी थकवले, खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचे 9 कोटी थकीत

हे वाचलं का?

    follow whatsapp