Mumbai Tak Chavadi: 'जर भविष्यात शिंदे साहेब उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी मी शिदेंसोबतच राहणार', निलेश राणेंचं मोठं विधान
Shiv Sena MLA Nilesh Rane: शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना एक मोठं विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: 'भविष्यात एकनाथ शिंदे हे जरी उद्धव ठाकरेंसोबत गेले तरीही मी त्यांच्यासोबत राहणार. साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर मी राहणार..' असं मोठं आणि भुवया उंचावणारं विधान शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी केलं आहे. मुंबई Tak चावडीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
पाहा मुंबई Tak चावडीवर निलेश राणे नेमकं काय म्हणाले
प्रश्न: तुम्ही गेले काही दिवस सतत म्हणत आहात की, शिदें साहेबांसोबत शेवटपर्यंत राहणार.. कारण त्यांनी राजकारणात मला पुनर्जिवीत केलंय... राजकारण कधी काही होऊ शकतं. म्हणजे आपल्याला कधी वाटलं नव्हतं की, फडणवीस हे अजित पवारांशी युती करतील. उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत युती करतील.. समजा, भविष्यात एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत गेले तेव्हा निलेश राणे काय करणार?
निलेश राणे: जिथे शिंदे साहेब राहतील तिथे मी राहणार.
प्रश्न: म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत काम करणार?










