गोपीचंद पडळकरांच्या समोरच नितीन देशमुखांना मारहाण झाली, 'तो' Inside Video आला समोर

ऋत्विक भालेकर

Gopichand Padalkar and Nitin Deshmukh New Video: जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांसमोरच मारहाण झाल्याचा नवा व्हिडिओ हा आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

गोपीचंद पडळकरांसमोर झाली नितीन देशमुखांना मारहाण
गोपीचंद पडळकरांसमोर झाली नितीन देशमुखांना मारहाण
social share
google news

मुंबई: विधानसभेच्या परिसरात आज (17 जुलै) अचानक मोठा राडा पाहायला मिळाला. ज्यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना तुफान मारहाण केली. सुरुवातीला या मारहाणीचा आतल्या बाजूचा व्हिडिओ हा समोर आला होता. मात्र, आता या संपूर्ण घटनेचा एक नवा आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देणारा व्हिडिओ समोर आला आहे.

सुरुवातीला मारहाणीचं वृत्त जेव्हा समोर आलं तेव्हा काही पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांना गाठलं आणि घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली. पण त्यावेळी आपण तिथे नव्हतोच.. असं विधान पडळकरांनी केलं. मात्र, आता नव्याने जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात गोपीचंद पडळकर यांच्या समोरच नितीन देशमुख यांना मारहाण केल्याचं ठळकपणे समोर आलं आहे.

हे ही वाचा>> विधानभवनाच्या गेटसमोर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमध्ये शिवीगाळ

नव्या VIDEO मध्ये नेमकं काय?

विधानसभा परिसरातच हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं. त्यानंतर आता या घटनेचे नवनवीन व्हिडिओ देखील समोर येत आहेत. त्यातीलच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत की, जेव्हा नितीन देशमुख यांना पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली तेव्हा पडळकर हे तिथेच हजर होते.

मारहाणीची सुरुवात झाली कशी?

जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे विधानसभा परिसरात प्रवेश करण्यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून आत जात होते. त्याचवेळी दुसऱ्या दिशेला पायऱ्यांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह उभे होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp