विधानभवनाच्या गेटसमोर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमध्ये शिवीगाळ
Mumbai News : गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानभवनाच्या गेटजवळ मोठा राडा झाला. दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर भिडले

विधानभवनाच्या गेटवर नेमकं काय झालं?
Mumbai News : राज्यातील दोन आमदारांमध्ये विधानभवनासमोर दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. ते नेते दुसरे तिसरे कोणीही नसून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. तर दुसरे नेते भाजप जतचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता मंगळसूत्र चोराचा विजय असो असं म्हणत डिवचलं होतं. आता गोपीचंद पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आव्हाडांनी केला.
हेही वाचा : Bala Nandgaonkar Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकरांची Exclusive मुलाखत
जितेंद्र आव्हाडांचा आरोप काय?
गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. दोन्ही नेत्यांमध्ये शिवीगाळही झाली होती. त्यावर आव्हाडांनी गोपिचंद पडळकरांना धारेवर धरत टीका केली. ते म्हणाले की, त्यांनी दरवाजाला लाथ मारली तो दरवाजा आम्हाला लागला. या अशा गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे मी पुढं आलो, असे जितेंद्र आव्हाड असं म्हणाले.
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, मी मुंबईमध्ये गेली अनेक वर्षे राहिलो आहे. मग आमच्या अंगावर गाड्या का घालायच्या? व्हिडिओत दिसेल काय झालं नेमकं तेच. पहिल्यावेळीही असंच झालं आहे, जाणूनबुजून खोड काढायची. एवढा हा राग तुम्हाला का आला? तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय? असा आव्हाडांनी सवाल केला.
हेही वाचा : पाच मुलांची आई अविवाहित तरुणाच्या प्रेमात पडली, दोघेही होते एकाच घरात नंतर...नेमकं काय घडलं?
नेमकं घडलं?
हा सर्व प्रकार हा विधानभवनाच्या गेटच्या समोरच घडला असल्याची माहिती समोर आली. गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जोराचा वाद उफळला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दोन्ही नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली. दोन्ही नेते हे एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाडांनी पडखळकरांवर जोराचा हल्ला चढवला.