Bala Nandgaonkar Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकरांची Exclusive मुलाखत

मुंबई तक

Bala Nandgaonkar MNS: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का? याबाबत बाळा नांदगावकर यांनी नेमकं उत्तर दिलं आहे. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात युतीबाबत नांदगावकर यांनी बऱ्याच प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?
Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत मनसे नेते बाळा नांदगावकर

point

पाहा बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले

point

महाराष्ट्रातील राजकारणावर बाळा नांदगावकर यांचं व्हिजन

Mumbai Tak Baithak 2025 MNS Leader Bala Nandgaonkar: मुंबई: मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय असणारे बाळा नांदगांवकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत सूचक विधान केलं आहे. याशिवाय मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्रातील आगामी राजकारण यावर त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तरं दिली. 

'मराठीच्या मुद्द्यामुळे हिंदी सक्तीचा जीआर आणला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले. पण ते एका विषयापुरतं एकत्र आले. निवडणुका अद्याप दूर आहेत.' असं म्हणत बाळा नांदगावकरांनी याविषयी संदिग्ध असंच उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर?

प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र भेटले होते

बाळा नांदगावकर: राज ठाकरेंचे अनेकांशी चांगले संबंध होते. त्यामुळे ते नेत्यांना भेटायला जातात. देवेंद्र फडणवीस आणि  राज ठाकरेंचं संबंध चांगले आहेत, पण त्याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये.

प्रश्न: दोन्ही भाऊ राजकारणासाठी एकत्र आले? युती होणार का?

बाळा नांदगावकर: 2017 मी स्वत: मातोश्रीला गेलो होतो.. पण त्यावेळी काही घडलं नाही. पण आता ज्या घडामोडी घडल्या. ते म्हणजे मराठीच्या विषयामुळेच आम्ही एकत्र आलो. राज ठाकरे साहेब म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे आभार की, त्यांच्यामुळेच आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलो. 

समविचारी माणूस सोबत असेल तर त्याच्यासोबत बोलायला हरकत नाही. राजकारणात संवाद, मतभेद या सगळ्या गोष्टी असतात. मतभेद बाजूला ठेवून जर एखादी गोष्ट मराठी माणसाच्या हितासाठी घडत असेल तर संवाद साधला पाहिजे. म्हणून त्या दिवशी पण सांगितली. त्यांनी मराठी या विषयाची चौकट देखील सोडली नाही. चौकट न सोडता मराठीचा मुद्दा ठामपणे मांडला.

हे ही वाचा>> Eknath Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना मी नेहमीच...' एकनाथ शिंदेंनी मनातलं सांगितलं!

मराठीच्या विषयाचा संबंध हा तुम्ही निवडणुकांशी लावत आहात. पण निवडणुका सध्या खूप वेळ आहेत. ठीक आहे ना.. एखादा विषय घेऊन एकत्र येऊन त्या विषयापुरता वाटचाल करत आहोत तर काही अडचण नाही. 

दोन्ही पक्ष एकाच पद्धतीच्या विचारधारेची आहेत. दोन्ही पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. महाराष्ट्राच्या तमाम मराठी माणसांच्या मनात जरी असली तरीही त्याला एक प्रोसेस असते. 

प्रश्न: ठाकरे ब्रँड हा एकाच व्यक्तीबाबत नाही,तर ठाकरेंचा वारसा सांगणारा आहे. भाजपच्या पुढे हा ठाकरे ब्रँड कसा टिकेल?

बाळा नांदगावकर: ठाकरे हा ब्रँड नाही त्याचं कारण असं की, ठाकरे ही एक विचारधारा आहे. त्यामुळे ठाकरे बाणा म्हणा, ठाकरे एक विचारांची शैली आहे, असं म्हणा.

प्रश्न: मराठी भाषेवरून सध्या राज्यात जे सुरू आहे त्याबाबत काय सांगाल? 

बाळा नांदगावकर: महाराष्ट्रात जे लोक येतात त्याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे. कारण हिंदीची सक्ती आम्हाला अजिबातच नाही. आमची ही मुलं इंग्रजीमध्ये शिक्षण घेतात. पण त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की, तुम्ही मराठी भाषेचा सन्मान करा.

हे ही वाचा>> Shashikant Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'हिटलरशाही लवकरच संपणार', निलेश लंकेंनी थेट साधला निशाणा.. हिंदुत्वावरही बेधडक बोलले!

प्रश्न: एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज ठाकरेंची डिनर डिप्लोमसी देखील पार पडली..
 
बाळा नांदगावकर: एकनाथ शिंदे हे खरोखर कॉमन मॅन आहेतच. पण प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा असतो, त्यामुळे जो तो आपल्या पक्षाचा आधी विचार करतो. एकनाथ शिंदे हे खरचं आमचं चांगले मित्र आहेत. 

प्रश्न: मराठी माणूस हा प्रचंड हळवा आहे, मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरु आहे?

बाळा नांदगावकर: राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. तुम्हाला वाटत तरी होतं का की काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल. सर्वच राजकीय नेते चांगले आहेत, मी फक्त राज ठाकरे यांच्यासोबत असणार आहे. असं नांदगावकर म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp