राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, कारला समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली धडक
NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News : राजकारणाबरोबरच सामाजिक उपक्रमांतही गीताताई हिंगे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्या ‘आधार विश्व फाउंडेशन’च्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या आणि या संस्थेमार्फत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना मदत केली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू
कारला समोरुन येणाऱ्या वाहनाने दिली धडक
NCP women regional vice president geetatai hinge death in Gadchiroli Accident News : गडचिरोली जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीताताई हिंगे (Geetatai Hinge) यांचा पाचगाव परिसरात झालेल्या गंभीर अपघातात मृत्यू झाला. रविवारी उशिराच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात दु:ख व्यक्त केले जात आहे.
नागपूरवरून परतताना भीषण अपघात
रविवारी खासगी कारणासाठी गीताताई हिंगे नागपूरला गेल्या होत्या. रात्री उशिरा गडचिरोलीकडे परतत असताना पाचगावजवळ त्यांच्या चारचाकीला समोरून येणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. धडक एवढी गंभीर होती की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतींना किरकोळ दुखापती झाल्या असून, स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे.
हेही वाचा : कोल्हापूर : कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश










