तोतया IAS महिलेने मराठवाड्यातील खासदाराला लावला चुना, फसवणूक झाल्याचं समजताच म्हणाले...

मुंबई तक

Maharashtra Politics : एका तोतया IAS महिलेने हिंगोलीच्या खासदाराला चुना लावल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान, फसवणूक झाल्याचं समोर येताच नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

maharashtra politics
maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तोतया IAS महिलेने मराठवाड्यातील खासदाराला लावला चुना

point

फसवणूक झाल्याचं समजताच म्हणाले...

Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगर येथील बनावट आयएएस अधिकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी कल्पना भागवत हिच्या फसवणुकीचा आणखी एक मोठा तपशील समोर आला आहे. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांची देखील या महिलेनं आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आष्टीकर यांच्याकडून तब्बल 1 लाख 45 हजार रुपये उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून कल्पना भागवत यांची सखोल चौकशी सुरू असून, तिच्या विविध बँक खात्यातील व्यवहारांची छाननी केली जात आहे. या तपासात हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचे नाव समोर आल्याने प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. भागवतच्या खात्यावर जमा झालेल्या रकमांमध्ये आष्टीकर यांच्या नावाचा उल्लेख सापडल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 4 वर्षांच्या चिमुरडीला बाथरूममध्ये नेलं, नंतर जमिनीवर डोकं आपटलं, गळा दाबून... मदतनीसनं ओलांडली क्रूरतेची सीमा

या प्रकरणावर खासदार नागेश आष्टीकर यांनी प्रतिक्रिया देताना, सांगितल्या जाणाऱ्या रकमेबाबत आक्षेप नोंदवला. त्यांनी स्पष्ट केले की, “बोलली जात असलेली इतकी मोठी रक्कम माझ्याकडून दिली गेलेली नाही.” कल्पना भागवत या एका नातेवाईकाच्या ओळखीने भेटल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला राम भद्राचार्य महाराज यांच्या शिष्य म्हणून ओळख देत तिने धार्मिक कार्यासाठी मदतीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp