Chhagan Bhujbal Mumbai Tak Baithak 2025: 'पवार किंवा ठाकरे कुटुंब एकत्र येतील असं अजिबात वाटत नाही', छगन भुजबळांचं सर्वात मोठं विधान
Chhagan Bhujbal Shiv Sena UBT: 'पवार किंवा ठाकरे कुटुंब एकत्र येतील असं अजिबात वाटत नाही', असं खळबळजनक विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई Tak बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री छगन भुजबळ
पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले
महाराष्ट्रातील राजकारणावर छगन भुजबळ यांचं व्हिजन
Mumbai Tak Baithak 2025 Chhagan Bhujbal: मुंबई: 'राजकारणात आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. म्हणून मी आजसुद्धा सांगतो.. पवार कुटुंब किंवा ठाकरे कुटुंब हे अजिबात एकत्र येईल असं मला वाटत नाही..' असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती होईल अशी जोरदार चर्चा सुरू असताना भुजबळांनी मुंबई Tak बैठक कार्यक्रमात केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'पवार कुटुंब किंवा ठाकरे कुटुंब एकत्र येईल असं मला अजिबात वाटत नाही', पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
प्रश्न: तुम्ही अनेकदा उल्लेख केला की, काँग्रेस फुटली विभक्त झाली.. दरम्यान आता NCP आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता फुटले आहेत. कौटुंबिक कारणामुळे हे झालं आहे. तुम्ही दोन्ही पक्षाच्या अगदी जवळ होतात. विभक्त झालेले हे गट किंवा पक्ष पुन्हा एकत्र येतील असं वाटतं का? राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी भुजबळ प्रयत्न करतील का?
छगन भुजबळ: हे पाहा.. दोन्ही ठाकरे बंधूंना ते लहान असल्यापासून ओळखतो. राज आणि राजचा दादू.. म्हणजे उद्धव.. राज वैगरे सगळे त्यांना दादू-दादू म्हणायचे. हे सगळे एकत्र यावे असं मला वाटतं.अजितदादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावे असंही मला वाटते. ही तुमच्या-आमच्या काही लोकांच्य मनातील इच्छा आहे. पण राजकारणात आपण ठरवतो तसं होतंच असं नाही. म्हणून मी आजसुद्धा सांगतो.. हे दोन्ही ठिकाणी एकत्र येणं आज तरी शक्य वाटत नाही.
कारण मनोमिलन हे एक कारण असतं आणि राजकारण हे दुसरं मोठं कारण असतं. दोन्ही कारणातून ज्यावेळेस ते बाहेर पडतील आणि योग्य वेळेला जवळ येतील तेव्हा हे होईल.










