'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?
CM Devendra Fadnavis: आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची विधीमंडळ परिसरात झालेल्या मारहाणीची आज विधानसभा अध्यक्षांनी दखल घेतली. पण याच वेळी एका मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड संतापलेले दिसून आले.
ADVERTISEMENT

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची काल (17 जुलै) विधीमंडळ परिसरात तुफान हाणामारी झाली. ज्या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे आज (18 जुलै) विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण कारवाईसाठी विशेष अधिकार समितीकडे सोपवलं आहे. पण निवदेनादरम्यान झालेल्या एका मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवेदनानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे बोलण्यास उभे राहिले. कालच्या हाणामारीच्या प्रकरणावर बोलताना आव्हाडांनी नंतर त्यांना व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीचा उल्लेख केला. तेव्हा अध्यक्षांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे NCP (SP) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आव्हाडांना बोलू द्यावं बंदी करू नये असं अध्यक्षांना सांगितलं.
हे ही वाचा>> गोपीचंद पडळकरांच्या समोरच नितीन देशमुखांना मारहाण झाली, 'तो' Inside Video आला समोर
पण याचवेळी स्वत: मुख्यमंत्री उभे राहिले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जात आहे असा आरोप केला. त्यावेळी मुख्यमंत्री थेट असं म्हणाले की, 'आज या ज्या शिव्या बाहेर पडतायेत त्या काय एकट्या पडळकरला किंवा आव्हाडांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की, हे सगळे आमदार माजले म्हणून...' असं म्हणत फडणवीसांनी सगळ्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.