Aaditya Thackeray Mumbai Tak Baithak 2025: शिवसेना UBT-मनसे युती होणार? 'मुंबई तक'च्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं, काय म्हणाले?

मुंबई तक

Aaditya Thackeray Shiv Sena UBT: Mumbai Tak Baithak 2025 Aaditya Thackeray: शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकाच व्यासपीठावर आले अन् सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले.

ADVERTISEMENT

Aaditya Thackeray Interview Mumbai Tak Baithak
Aaditya Thackeray Interview Mumbai Tak Baithak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई Tak बैठकीत शिवसेना UBT नेते आदित्य ठाकरे

point

पाहा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले

point

महाराष्ट्रातील राजकारणावर आदित्य ठाकरेंचं व्हिजन

Mumbai Tak Baithak 2025 Aaditya Thackeray: शिवसेना UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून एकाच व्यासपीठावर आले अन् सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले. ठाकरे ब्रँड आगामी निवडणुकीत विरोधकांना घाम फोडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. परंतु, ठाकरे बंधू एकत्र येण्याची राजकीय गणित वेगळी आहेत. सध्या तरी युतीबाबत अधिकृतपणे घोषणा झाली नाहीय, असा सूर मनसेनं आवळला होता. अशातच मुंबईत TAK  च्या बैठकीत शिवसेना यूबीटीचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांनी ठाकरे भेटीबाबत स्पष्टच सांगितलं. 

मुंबई तक बैठकीत आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

ही फक्त राज आणि उद्धव यांची भेट नव्हती. आदित्य आणि आमित अशी सुद्धा भेट नव्हती. ठाकरे परिवार 20 वर्षानंतर एकत्र आला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लहानपणापासून एकमेकांसोबत वाढले आहेत. तुम्ही दोघेजण 20 वर्षात फार कमी वेळ भेटला असाल, तुमचं वाढणं एकत्रित नव्हतं, कशा भावना होत्या? या प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, 20 वर्षानंतर भेट झाली. लग्नात, कुणाच्या साखरपुड्यात, एखाद्या कार्यक्रमात भेटलो की, आम्ही हाय हॅलो म्हणायचो. पण मंचावर दोन्ही भाऊ एकत्र येताना, एक वेगळा अनुभव होता.

हे ही वाचा >> Bala Nandgaonkar Mumbai Tak Baithak 2025: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? बाळा नांदगावकरांची Exclusive मुलाखत

तो अनुभव नुसतं कुटुंब म्हणून नाही..तर साधारणपणे आजूबाजूला जी लोकं होती, कुठून कुठून आली होती..नंतर मी पुढचे दोन आठवडे प्रत्येक दिवसाला 80-90 स्टोरीजमध्ये टॅग झालोय. ते जे वातावरण होतं, त्यात लोकांची आशा होती. त्यात ताकद दिसत होती. सगळे एकत्र येण्याची ताकद होती. सरकारला मागे जायला लागलं. जो उत्साह होता..आनंद होता..मी अनेक लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले. ते वातावरण खूप वेगळं होतं. कुटुंब म्हणून नाही. पण महाराष्ट्रावर कोणी अन्याय करायला आला, तर महाराष्ट्र सगळे भेदभाव ते पक्षातले असतील किंवा मनातले असतील, जुने समज गैरसमज दूर करून एकत्र येऊ शकतो. त्यांच हे प्रतिक होतं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

चर्चा अशी आहे की..एक मुद्द्यासाठी दोघे एकत्र आले. दोन दिवसांचं अधिवेशन झालं आणि त्यानंतर राज ठाकरेंचं एक ट्वीट आलं की, तुम्ही त्याबद्दल खूप अंदाज बांधू नका. पण एकूण इव्हेंट पाहिला तर ते नुसतं 20 वर्षांचं भावा-भावाचं रियुनीयन नव्हतं..यावर मत व्यक्त करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे निश्चितपणे जाणवलं की दोन्ही एकत्र येऊन काय ताकद आपण निर्माण करू शकतो. महाराष्ट्रात जे वातावरण होतं, ते निर्माण झालं आणि आजंही आहे. ते स्पष्टपणे सगळ्यांना दिसत आहे. 20 वर्ष जरी कम्युनिकेश नसलं, तरी आधीचे 20 वर्ष ते एकत्रित वाढलेत. कुठे ना कुठे त्या दोघांच्या मनात काहीतरी विचारसरणी असेल. मला वाटतं, एक थोडी स्पेस दोघांना दिली पाहिजे. राजकीय दृष्ट्‍या आणि सामाजिक दृष्ट्‍या आपण पाहतो,भाजप असेल किंवा त्यांच्या सोबतची लोकं असतील. महाराष्ट्र संपवायला निघालेत. ही दिवार जरी तुटली, तरी हे जे महाराष्ट्रविरोधी लोक आहेत, तर त्यांच्यासमोर दिवार कशी उभी करायची. यासाठी दोघांना ती वेळ, ती स्पेस देणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा >> Eknath Shinde Mumbai Tak Baithak 2025: 'मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री समजलोच नाही, त्यांना मी नेहमीच...' एकनाथ शिंदेंनी मनातलं सांगितलं!

हे वाचलं का?

    follow whatsapp