NCP सोबत पटत नाही, मांडीला मांडी लावून बसलो की, बाहेर येऊन उलट्या होतात: तानाजी सावंत

मुंबई तक

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान
social share
google news

बातम्या हायलाइट

point

''राष्ट्रवादी सोबत असल्याने उलट्या होतात''

point

राष्ट्रवादीचा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा

point

महायुतीत पडला मिठाचा खडा

Tanaji Sawant vs Umesh Patil : राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात", असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सावंत यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी  आक्रमक झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे विधानसभेआधी महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (mahayuti dispute ncp ajit pawar umesh patil vs tanaji sawant shiv sena vs ajit pawar ncp maharashtra politics)

ADVERTISEMENT

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केला आहे. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.

हे ही वाचा : Shivaji Maharaj: परवानगी फक्त 6 फुटाच्या पुतळ्याला, अचानक कोणी वाढवली महाराजांच्या पुतळ्याची उंची?

''तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तीमत्व आहे. शुन्यातून विश्व निर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा. पण त्यांची अशी ही वक्तव्ये ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाट वाटते. ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही. माझी त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की, आपण स्वाभिमानी आहोत. आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू'', असं उमेश पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

''तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत, आरोग्याचा काही संबंध असेल. मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील'', असा टोला अमोल मिटकरी यांनी सावंताना लगावला आहे. 

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असंही तानाजी सावंत म्हणाले होते. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'हा' फॉर्म भरा! झटपट बँकेत योजनेचे पैसै होतील जमा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT