“जातीयवादी कोण?”, मीरा रोड हत्याकांडावरून अंधारे, आव्हाड का संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mira road live in partner murder case sushma andhare and jitendra awhad criticize
mira road live in partner murder case sushma andhare and jitendra awhad criticize
social share
google news

Latest Marathi News : मीरा रोडमधील (Mira Road) लिव्ह इन पार्टनर (live In Partner) हत्याकांडाने मुंबईसह संपूर्ण देश हादरला आहे. या हत्याकांडात आरोपीने 36 वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची क्रुरपणे हत्या करून अत्यंत नि्र्दयीपणे विल्हेवाट लावली होती. पोलिसांनी (Police) आरोपी मनोज सानेला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले असता, त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करून गंभीर आरोप केले आहेत. (mira road live in partner murder case sushma andhare and jitendra awhad criticize)

ADVERTISEMENT

मीरा रोडमधील लिव्ह इन पार्टनर हत्याकांडावर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. लव जिहादच्या बोंबा ठोकून सामाजिक वातावरण दुषित करणारे नितेश राणे,नवनीत राणा किंवा मोहित कंबोज यांना सरस्वती वैद्य हत्याकांडाबद्दल काही बोलायचे आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. अशा घटना वारंवार का घड़तायत? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा अपयशी ठरत आहेत, यावर जाहीरपणे बोलणार का ? असा सतप्त सवाल देखील अंधारे यांनी विचारला आहे.

हे ही वाचा :  हत्याकांड घडलेला ‘तो’ फ्लॅट आमदार गीता जैन यांच्या पतीचा

हे वाचलं का?

सुषमा अंधारे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. एक काळ असा होता, जेव्हा गुन्हेगारांचे नाव आणि ओळख गुप्त ठेवली जायची. पण 2014 नंतर प्रसार माध्यमांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभापासून सरकारच्या प्रचार यंत्रणेत आपली भूमिका बदलली आणि प्रसारमाध्यमांनी जातीयवादी कोन इत्यादी आणण्यासाठी गुन्हेगारांची नावे दाखवण्यावर लक्ष केंद्रित केल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी सरकार आणि माध्यमांवर केली.

ADVERTISEMENT

जितेंद्र आव्हाड यांनी एएनआयचे एक ट्विट रिट्वीट करत ‘दक्षिण आशियातील सर्वात मोठी वृत्तसंस्था’ गुन्हेगाराची आडनावे दुरुस्त करण्यात कशी व्यस्त आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली. तसेच सरकारच्या उत्तरदायित्वावर खरा प्रश्न विचारत नाही,अशी खंत देखील आव्हाड यांनी व्यक्त केली. गेल्या 9 वर्षात लोकशाही म्हणून आपली किती अधोगती झाली, याचे हे उदाहरण असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : तीन बकेट रक्त… प्रेयसीचे तुकडे कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये वाटले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT