MOTN: Ladki Bahin Yojana प्रचंड चर्चेत, पण महाराष्ट्रातील जनता 'या' गोष्टीवरून शिंदे सरकारवर खूपच नाराज!
Mood of The Nation, India Today C Voter Survey : आज तकच्या मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणात महाराष्ट्रातील शिंदे सरकार, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या कार्यपद्धतीवर आपली मतं मांडली आहेत. या सर्वेक्षणात जनतेने समाधानी, काही अंशी समाधानी आणि नाखुश अशी मते नोंदवली आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शिंदे सरकारचा कारभार किती लोकांना आवडला?
34 टक्के जनताही सरकारच्या कामावर नाखुश
पण शिंदेंची कार्यपद्धती जनतेला आवडते आहे
Mood of The Nation, India Today C Voter Survey : राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खुप चर्चेत आहे. या योजनेमुळे महिला वर्ग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महायुती (Mahayuti) सरकारवर प्रचंड खूश आहे. त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राची जनता ही शिंदे सरकारच्या कारभारावर खुश असेल असा अंदाज असेल.पण इंडिया टुडेचा सी व्होटर सर्व्हे (India Today C Voter Survey) हा शिंदे सरकार आणि महायुतीची झोप उडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व्हेत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात. (mood of the nation india today c voter survey maharashtra people have mixed opinion on working of eknath shinde goverment mps mls maharashtra politics)
ADVERTISEMENT
आज तकच्या मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षणात महाराष्ट्रातील शिंदे सरकार, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या कार्यपद्धतीवर आपली मतं मांडली आहेत. या सर्वेक्षणात जनतेने समाधानी, काही अंशी समाधानी आणि नाखुश अशी मते नोंदवली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने नेमका काय कौल दिलाय तो पाहूयात.
शिंदे सरकारचा कारभार किती लोकांना आवडला?
MOTN च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील 25 टक्के जनता ही शिंदे सरकारच्या कारभारावर पूर्णपणे समाधानी आहेत, तर 34 टक्के लोकही काही अंशी समाधानी आहेत. तर जवळपास 34 टक्के जनताही सरकारच्या कामावर नाखुश असल्याचे सर्व्हेतून समोर आली आहे. त्यामुळे सर्व्हेनुसार शिंदे सरकारच्या कामगिरीवर जनतेमध्ये संमिश्र मत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येतेय.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Mood of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा देशात कितवा नंबर?, पाहा किती टक्के लोकांची पसंती
शिंदेंच्या कार्यपद्धतीवर जनता समाधानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर 35 टक्के जनता समाधानी आहेत. तर 31 टक्के जनताही काही प्रमाणात समाधानी आहे.तथापि, 28 टक्के लोक त्यांच्या कार्यपद्धतीवर असमाधानी आहेत. यावरून मुख्यमंत्र्यांची कामगिरी काही प्रमाणात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत असल्याचं दिसून येतं, पण अजूनही सुधारणेला वाव असल्याचे समजते.
खासदार, आमदारांचं प्रदर्शन कसं आहे?
सर्व्हेनुसार खासदारांच्या कामगिरीवर 32 टक्के जनता समाधानी आहे तर 22 टक्के जनता काही प्रमाणात समाधानी आहे. आणि तितकेच टक्के जनताही असमाधानी आहेत.
ADVERTISEMENT
आमदारांबद्दल बोलायचं झालं तर 41 टक्के जनताही आमदारांच्या कामगिरीवर समाधानी आहे. खासदारांच्या तुलनेत आमदारांच्या कामगिरी चांगली असल्याचे यावरून स्पष्ट होतेय. तर 26 टक्के जनताही आमदारांच्या कामगिरीवर काही अंशी समाधानी आहे. तर 27 टक्के जनताही असमाधानी आहे. यावरून आमदारांच्या कामावर जनता अधिक समाधानी असल्याचे स्पष्ट होते.
ADVERTISEMENT
'हा' मुद्दा डोकेदुखी वाढवणार?
या सर्वेक्षणातून असेही समोर आले आहे की महाराष्ट्रातील लोकांसाठी सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे, ज्याला 32% लोकांनी प्राधान्य दिले आहे. यानंतर 15% लोकांसाठी विकास आणि महागाई हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे मानले आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांना 13% लोकांनी प्राधान्य दिले आहे, तर कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांकडे अनुक्रमे 2% आणि 4% लोकांनी लक्ष दिले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, रोजगाराचा अभाव ही राज्यातील जनतेची सर्वात मोठी चिंता आहे.
हे ही वाचा : MOTN: आज जर निवडणुका झाल्या तर काय आहे महाराष्ट्राचा मूड, महायुतीसाठी धोक्याची घंटा?
विरोधकांच्या कामगिरीवर जनता असमाधानी
राज्यातील विरोधी पक्षाच्या भूमिकेवर 11 टक्के जनताही समाधानी आहे, तर 21 टक्के जनताही काही प्रमाणात समाधानी आहे. तर 30 टक्के जनता विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीवर असमाधानी आहेत. यावरून विरोधकांनी अधिक प्रभावी भूमिका बजावावी अशी जनतेची अपेक्षा असल्याचे दिसून येते.
सरकार आणि नेत्यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्रातील जनता संमिश्र असल्याचे MOTN सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. बेरोजगारी हा राज्यातील सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरतोय. आणि विरोधकांनी आपली भूमिका मजबूत करणे आवश्यक आहे जेणेकरून ते जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील.
दरम्यान AajTak चा मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण 15 जुलै ते 10 ऑगस्ट 2024 दरम्यान करण्यात आले. या सर्वेक्षणात 1,36,436 लोकांची मते जाणून घेण्यात आली. देशभरातील 543 लोकसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्याद्वारे जनतेचे विचार आणि मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वेक्षणामुळे देशाच्या सद्यस्थितीबाबत जनतेचे विचार पुढे आले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT