कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार? शरद पवार यांचं धक्कादायक भाकीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP president Sharad Pawar has predicted that the Congress government will come to power in Karnataka
NCP president Sharad Pawar has predicted that the Congress government will come to power in Karnataka
social share
google news

मुंबई : कर्नाटकमध्ये (Karnataka) सध्या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. कर्नाटकमध्ये 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार असून, 13 मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) या दोन्ही प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच कर्नाटकमध्ये या निवडणुकीत काँग्रेसचे सरकार येणार असल्याचं मोठं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविलं आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार बोलत होते. (NCP president Sharad Pawar has predicted that the Congress government will come to power in Karnataka.)

ADVERTISEMENT

काय म्हणाले शरद पवार?

कर्नाटकात आणि नंतर इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत तुमचा अंदाज काय आहे? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, माझं आकलन असं आहे की, 2 प्रकारच्या निवडणुका आहेत, एक राष्ट्रीय निवडणूक केंद्र सरकारसाठी आणि एक राज्यांसाठी. माझं वैयक्तिक आकलन वेगळं आहे, तुम्ही कदाचित मान्य करणार नाही. पण राज्याच्या निवडणुका वेगळ्या असतात असं माझं आकलन आहे. तुम्ही देश आणि राज्य बघाल तर, तुम्हाला केरळात बिगर भाजप, तामिळनाडूमध्ये बिगर भाजप, आंध्र प्रदेशमध्ये बिगर भाजप, तेलंगणामध्ये बिगर भाजप आमि आता कर्नाटकातील निवडणुका बघितल्या तर, तिथंही काँग्रेस येईल, असं माझं ठाम आकलन आहे.

हेही वाचा : Adani समूहाला मिळालेल्या ‘धारावी’ प्रोजेक्टवर शरद पवार स्पष्ट बोलले…

मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार होते, कमलनाथ मुख्यमंत्री होते. आमदार फोडून भाजपनं तिथं सरकार स्थापन केलं. त्यामुळे तिथं निवडणुका लागल्यानंतर परिस्थिती बदलू शकते. राजस्थान बिगर भाजप आहे, पंजाब बिगर भाजप आहे, दिल्ली बिगर भाजप आहे, ममताच्या पश्चिम बंगालमध्येही बिगर भाजप आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल अनेक राज्य बिगर भाजपाच्या पाठिंब्यामध्ये येऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो, त्याचप्रमाणे जेव्हा संपूर्ण देशात राष्ट्रीय निवडणुका येतील, तेव्हा आम्ही सगळे मिळून काहीतरी करू, तर चित्र वेगळं असेल. पण भाजपकडे दुर्लक्ष करणं इतकं सोपं राहणार नाही, जोपर्यंत आपण एकत्र काहीतरी करत नाही.

हे वाचलं का?

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 : महत्त्वाच्या तारखा

-23 एप्रिल 2023 रोजी निघणार अधिसूचना
-20 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
-21 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार
-24 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख
-10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान
-13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

हेही वाचा : शरद पवारांचा थेट राहुल गांधींवर हल्ला, अदाणींवरील आरोपांवरून पिळले कान

कर्नाटक विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल

-एकूण जागा 224, बहुमतासाठी लागणारी संख्या 123
– भाजपचे सध्या 117 आमदार असून, 2018 मध्ये 117 जागा, तर 2013 मध्ये 40 जागा मिळाल्या होत्या.
-काँग्रेसच्या आमदारांची संख्या 69 असून, 2018 मध्ये 80 जागा, तर 2013 मध्ये 122 जागा जिंकल्या होत्या.
-जेडीएसचे सध्या 32 आमदार असून, 2018 मध्ये 37 आमदार निवडून आले होते. 2013 मध्ये 40 जागा जिंकल्या होत्या.
-सध्या अपक्ष आमदारांची संख्या 6 असून, 2018 च्या निवडणुकीत 3 अपक्ष निवडून आले होते. 2013 मध्ये 22 अपक्ष आमदार निवडून आले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT