Modi speech : पंतप्रधान मोदींनी सांगितला I.N.D.I.A चा अर्थ

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pm narendra modi explained the meaning of opposition india no confidence motion manipur voilence)
pm narendra modi explained the meaning of opposition india no confidence motion manipur voilence)
social share
google news

मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावाच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत हजर होते. यावेळी संसदेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या इंडिया पक्षाची खिल्ली उडवत टीका केली. याचसोबत विरोधकांच्या INDIA नावाचा अर्थ देखील सांगितला. (pm narendra modi explained the meaning of opposition india no confidence motion manipur voilence)

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या INDIA वरून टीका करताना म्हणाले की, INDIA या नावात दोन I दिले आहे. या I चा अर्थ म्हणजे मी पणा,त्यामुळे या 26 पक्षांना मी पणाचा अभिमान आहे, तर दुसरा I काँग्रेसचा आहे, त्यामुळे काँग्रेसला कुटुंबाचा अभिमान आहे, अशी टीका मोदी यांनी INDIA चा अर्थ सांगताना काँग्रेस आणि विरोधकांवर केली आहे.

हे ही वाचा : ‘…पण यांनी भारत मातेचे तीन तुकडे केले’, राहुल गांधींवर PM मोदींचा घणाघात

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘दूर युद्ध से भागते, नार रखा रणधीर, भाग्यचंद की आज तक सोई है तकदीर’ अशी ओळ देखील म्हणत राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली. युद्धातून पळ काढतात, म्हणूनच भाग्यचंदचे(राहुल गांधी)नशीब अजूनही चमकले नाही,अशी टीका मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. लंका हनुमानाने जाळली नाही, ती त्या (रावणाच्या) गर्वाने जाळली. जनता देखील रामाचे रूप आहे, म्हणूनच 400 वरून 40 (काँग्रेस खासदार) झाले आहेत, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

हे वाचलं का?

राहुल यांच्या भाषणाचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, अनेकवेळा वाईट बोलण्याच्या हेतूनेही सत्य बाहेर येते. लंका हनुमानाने जाळली नाही, ती त्याच्या (रावणाच्या) गर्वाने जाळली. जनता देखील रामाचे रूप आहे, म्हणूनच 400 वरून 40 (काँग्रेस खासदार) झाले आहेत.
एकेकाळी काँग्रेस नेत्यांच्या वाढदिवसाचे केक विमानात कापले जायचे, पण आज त्याच विमानातून गरीबांसाठी वॅक्सीन आणली जात आहे. ड्रायक्लीनसाठी कपडे देखील विमानातून यायचे. आज त्याच विमानातून एक गरीब चप्पलवाला प्रवास करतोय. तसेच एकेकाळी सुट्टीसाठी, मौजमजेसाठी नौदलाची युद्धनौका नेली जायची.मात्र आता दुरवर अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी जहाजांचा वापर होतो आहे, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

हे ही वाचा : PM Modi Speech Manipur: अखेर पंतप्रधान मोदी मणिपूर हिंसाचारावर बोलले, पण…

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT