PM Modi Speech Manipur: अखेर पंतप्रधान मोदी मणिपूर हिंसाचारावर बोलले, पण…
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाषण करताना पंतप्रधान मोदींनी थेट विरोधकांनी सभात्याग केल्यानंतरच मणिपूर हिंसाचारावर बोलण्यास सुरुवात केली. पाहा ते हिंसाचारावर नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

PM Modi Speech on Manipur Violence: मुंबई: मणिपूर हिंसाचारवर (Manipur violence) सभागृहात निवेदन करण्यास तयार नसल्याचं म्हणत विरोधकांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अविश्वास प्रस्तावावर तब्बल तीन दिवस सभागृहात चर्चा झाली. ज्यानंतर सगळ्यात शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज (10 ऑगस्ट) सभागृहात भाषण झालं. मोदींनी तब्बल 2 तासाहून अधिक वेळ भाषण केलं. पण भाषणातील पहिले दीड तास ते मणिपूर हिंसाचारावर एकही शब्द बोलले. त्यामुळे बराच वेळ गदारोळ देखील घातला. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी बोलण्यास तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला. (no confidence motion pm modi started talking about violence in manipur after the opposition walked out of the lok sabha)
ज्या क्षणाला विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर तात्काळ मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मोदींनी काँग्रेसवर सातत्याने टीका केली. तसंच काँग्रेसच्या राजकारणामुळेच ईशान्येकडील राज्यांची अवस्था वाईट असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
अन् पंतप्रधान मोदी मणिपूरवर बोलले…
मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. त्यांनी आरोप केला की, ‘मोदी मणिपूरवर बोलत नाहीत.’ आणि ते लोकसभेतून निघून गेले. यानंतर मोदींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.. ते म्हणाले की, ‘ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते बोलायला तर तयार आहेत पण ऐकायला मात्र अजिबात तयार नाहीत. ते खोटे बोलून पळून जातात.’
यानंतर मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘याबाबत जर विरोधकांनी गृहमंत्र्यांनी दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली असती तर फक्त मणिपूरवर दीर्घ चर्चा होऊ शकली असती. पण त्यांना फक्त याबाबत राजकारण करायचं होतं.’ असं मोदी म्हणाले.
