Supreme कोर्टाने मोदी आडनावावर निर्णय देताच राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या डोक्यात…’

रोहित गोळे

ADVERTISEMENT

rahul gandhi reaction after gave verdict supreme court gave relief on modi surname case statement political news headlines today
rahul gandhi reaction after gave verdict supreme court gave relief on modi surname case statement political news headlines today
social share
google news

Rahul Gandhi Congress: नवी दिल्ली: मोदी आडनाव (Modi Surname) प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात हायकोर्टाने दिलेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस (Congress) पक्षासाठी दिलासादायक आहे. असं असताना राहुल गांधींनी या सगळ्या प्रकाराबाबत अत्यंत कमी शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मात्र अनेक ठिकाणी जल्लोष सुरू केला आहे. (rahul gandhi reaction after gave verdict supreme court gave relief on modi surname case statement political news headlines today)

ADVERTISEMENT

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्ट नेमकं काय म्हणालं?

शिक्षेला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, ‘गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा आदेश वाचणे खूपच मजेशीर आहे. यामध्ये त्यांनी खूपच उपदेश दिले आहेत.’ त्याचवेळी सॉलिसिटर जनरल म्हणाले की, ‘मला सांगायचे आहे की, अनेकवेळा कारणे न दिल्याने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली जाते. त्यामुळेच उच्च न्यायालयाकडून तपशीलवार कारणे दिली जातात. अशा टिप्पण्या थोड्या निराशाजनक असू शकतात.’

हे ही वाचा >> Supreme Court: राहुल गांधींच्या बाजूने निकाल, संजय राऊतांचं थेट मोदी-शाहांना चॅलेंज!

सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. यासोबतच त्यांना दोन वर्षांची शिक्षाही न्यायालयाने सुनावली होती. यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

हे वाचलं का?

कोर्टाच्या निकालानंतर राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

‘आज नाही तर उद्या.. पण सत्याचा विजय होतोच.. जे काही असेल.. माझा रस्ता क्लिअर आहे. मला काय करायचं आहे, माझं काय काम आहे. त्याबाबत माझ्या डोक्यात गोष्टी स्पष्ट आहेत. ज्या लोकांनी आमची मदत केली आणि जनतेने जे प्रेम आणि पाठिंबा दिला. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो..’ अशा संयमीपणे राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

2019 च्या निवडणूक प्रचारादरम्यान केले होते विधान

राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी ही आडनाव एकसारखीच का आहेत? सर्व चोरांची आडनाव मोदी का आहे? राहुल गांधींच्या यांच्या या विधानाबाबत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर कलम 499, 500 अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंची शेवटच्या दिवशी फटकेबाजी; उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

2019 मध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली, असा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT