"...याचं पुतण्या म्हणून कायम दुःख राहील", रोहित पवारांची अजित पवारांसाठी 'पोस्ट'

मुंबई तक

ADVERTISEMENT

रोहित पवार अजित पवारांना काय म्हणाले?
रोहित पवार आणि अजित पवार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांना रोहित पवारांना काय म्हणाले?

point

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून व्यक्त केली खंत

point

भाजपच्या नेत्यांनाही रोहित पवारांनी केले लक्ष्य

Pawar Politics : 'माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते', या अजित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरू झाली आहे. अजित पवारांच्या या विधानावर आता रोहित पवारांनी एक पोस्ट लिहिली असून, त्यांनी काही मुद्दे मांडत खंत व्यक्त केली आहे. (Rohit Pawar Write Post For Ajit Pawar)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून अडीच महिने झाल्यानंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबद्दल भाष्य केले. "मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यावेळी ते केले गेले. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. आज माझे मन मला सांगते की, असे व्हायला नको होते", असे अजित पवार म्हणालेले. 

रोहित पवार अजित पवारांना काय म्हणाले?

"आदरणीय दादा, 

हे वाचलं का?

खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे."

हेही वाचा >> ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला

"दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!

रोहित पवारांनी पोस्टमध्ये सुनेत्रा पवारांच्या उमदेवारीचा निर्णय अजित पवारांचा नव्हता, हेही अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भाजपलाही लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला राज्याच्या राजकीय पटलावरून बाजूला सारेन, असे म्हणत रोहित पवारांनी भाजपच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्याला लक्ष्य केले आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT