Amol Shinde : कल्याणमधून 1200 रुपयांत घेतले 5 स्प्रे; अमोलने पोलिसांना काय सांगितलं?
अमोल शिंदेला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी वेगळीच माहिती दिली. ‘सैन्यात भरती व्हायचे आहे, असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता.
ADVERTISEMENT
Amol Shinde security breach in lok sabha News : 13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेला चकमा देत दोन तरुणांनी थेट लोकसभा सभागृहात उड्या घेतल्या. सभागृहात दोन तरुणांनी धुडगूस घातला, तर संसदेबाहेर दोघांनी रंगाचे स्प्रे फवारले. यात एक तरुण होता महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील. अमोल शिंदे असे त्याचे नाव असल्याचे चौकशीतून समोर आले. पोलिसांनी अमोल शिंदेची कसून चौकशी केली, त्यात त्याने काही गौप्यस्फोट केलेत.
ADVERTISEMENT
संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोन तरुणांसह पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. सहा जण यात सहभागी असल्याचे चौकशीतून समोर आलं असून, फरार असलेल्या एकाचा शोध घेतला जात आहे.
अमोल शिंदेंने पोलीस चौकशीत काय केले खुलासे?
संसदेत आणि संसदेबाहेर गोंधळ घालणाऱ्या तरुणांची चौकशी करण्यात आली. यात लातुरच्या अमोल शिंदेचीही चौकशी झाली. अमोल हा महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे. तो पदवीधर आहे, पण बेरोजगार आहे. तो प्लंबर म्हणून काम करायचा, पण नंतर त्याने ते काम बंद केले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> लातूरचा अमोल ते गुरुग्रामचा विशाल, 6 जणांनी कसा रचला कट?
संसदेत आणि संसदेबाहेर रंगाचे स्प्रे फवारले गेले. हे स्प्रे ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून खरेदी केले होते, असे समोर आले आहे. अमोलने पोलिसांना सांगितले की, कल्याण येथून सुमारे 1,200 रुपयांना 5 रंग सोडणारे स्प्रे खरेदी केले होते.
लष्कर भरतीसाठी चाललो म्हणून सोडलं घर
अमोल शिंदेला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी वेगळीच माहिती दिली. ‘सैन्यात भरती व्हायचे आहे, असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. शिंदे हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असून, तो बीए पदवीधर आहे. पोलीस आणि सैन्य भरती परीक्षेची तयारी करत असताना त्याने रोजंदारी मजूर म्हणून वेगवेगळी काम केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> सैन्यात भरती होणार होता, पण… कोण आहे अमोल शिंदे?
शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसाचार
अमोल शिंदेने चौकशीत सांगितलं की, तो शेतकरी आंदोलनं, मणिपूरमधील हिंसाचार आणि बेरोजगारी सारख्या मुद्द्यामुळे व्यथित होता. त्यामुळेच आम्ही हे केले. देशातील सगळ्यांचे विचार सारखेच आहे. सरकारला संदेश देण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT