NCP : अजित पवारांच्या सभेआधीच शरद पवारांचा हल्लाबोल, पक्ष, चिन्हावर म्हणाले…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज कोल्हापूरात उत्तदायित्व सभा होत आहे. या सभेआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या दाव्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आपण जनतेमध्ये असलो की, पक्ष आणि चिन्ह हे महत्वाचं नसतं, त्याच्यावर आपण सहज मात करू शकतो, असे पवारांनी स्पष्ट केले. (sharad pawar big statement on ncp party and logo election commision decision ajit pawar)

ADVERTISEMENT

वाय.बी.सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा आपल्या जुन्या मित्रांकडून केला जातो. त्याच्या परिणाम कार्यकर्त्याच्या मनावर होतो. पण काही काळजी करू नका आपण जनतेमध्ये राहिलो की, पक्ष आणि चिन्ह हे महत्वाचं नसतं, त्याच्यावर आपण सहज मात करू शकतो. फक्त ही मानसिक तयारी आपली असली पाहिजे, असा विश्वास त्यांनी कार्यकर्ता आणि नेत्यांमध्ये भरला. सहा निवडणूका मी वेगवेगळ्या चिन्हावरून लढलो, तरीही देखील जनतेने मला निवडून दिलं, असे उदाहरण देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय येत असताना, यावर टीका टिप्पणी करायची नाही, ते जो निर्णय़ देतील तो अंतिम असेल,असे देखील शरद पवारांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : ‘आमदारकीसाठी राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं’; सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

आज खऱ्या अर्थान पुन्हा प्रस्थापित व्हायला संधी मिळाली आहे. अशा संकटाच्या काळात जे मजबूतीने उभे राहले, तेच खऱे आणि त्यांच्याच मदतीने निवडणूक लढायची, अशी घोषणाच शरद पवार यांनी यावेळी केली.

हे वाचलं का?

शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडी नावानंतर केंद्र सरकारने जी20 परीषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतीचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता. त्यामुळे देशाचे नाव इंडिया बदलून भारत केले जात असल्याचा वाद सुरु झाला आहे. या वादावरूनच शरद पवार यांनी तुम्ही इंडिया नावाने किती योजना काढल्यात.आता गेट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाला काय म्हणायचं, असा सवाल नरेंद्र मोदींना केला. समाजाच्या महत्वाच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करायचं आणि नाही त्या प्रश्नांना महत्व द्यायचं, हा दृष्टीकोन सध्याच्या राज्यकर्त्यांचा असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : Aditya L1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली, सुर्याच्या किती जवळ पोहोचला?

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT