Aditya L1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलली, सुर्याच्या किती जवळ पोहोचला?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

aditya l1 third earth bount maneuvre ebn3 performed successfully isro share update
aditya l1 third earth bount maneuvre ebn3 performed successfully isro share update
social share
google news

सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने आदित्य L1 हे यान अंतराळात पाठवले आहे. या यानाने पृथ्वीभोवती आता तिसऱ्यांदा कक्षा बदलली आहे. या प्रक्रियेला अर्थ बाऊंड मॅन्यूवर (EBN#3)असे देखील म्हणतात. आता हे अवकाश यान पृथ्वीभोवती 296 किमी x 71767 किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. इस्त्रोने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता आदित्य L1 हे यान सुर्याच्या कितीजवळ पोहोचले आहे. याची उत्सुकता आता नागरीकांमध्ये आहे.(aditya l1 third earth bount maneuvre ebn3 performed successfully isro share update)

इस्त्रोने 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून आदित्य एल 1 हे यान अंतराळात पाठवले होते. त्यानंतर 5 सप्टेंबरला आदित्य L1ने कक्षा बदलली होती. त्यानंतर हे यान गेल्या 5 दिवसापासून 282 किमी x 40225 किमी कक्षेतून पुढे सरसावत आहे. आता आदित्य L1 पहाटे 2.34 च्या सुमारास तिसऱ्यांदा कक्षा बदलली आहे. यालाच अर्थ बाऊंड मॅन्यूवर (EBN#3)असे देखील म्हणतात. आता हे अवकाश यान पृथ्वीभोवती 296 किमी x 71767 किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. कक्षा बदलण्याच्या ऑपरेशन दरम्यान मॉरिशस, बंगळुरू, SDSC-SHAR आणि पोर्ट ब्लेअर येथील इस्रो ग्राउंड स्टेशनने या ऑपरेशन दरम्यान उपग्रहाचा मागोवा घेतला.आता येत्या 15 सप्टेंबरला पहाटे 2 वाजता आदित्य L1 चोथ्यांदा कक्षा बदलणार आहे. याला EBN#4 म्हटले जाईल.

हे ही वाचा : NCP Kolhapur : ‘उत्तरदायित्व पोहचवण्यासाठीच ही कोल्हापूरची सभा’, अजित पवार गटाने भूमिका मांडली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंद्र आणि पृथ्वीचा काढला सेल्फी

आदित्य L1वर लावण्यात आलेल्या कॅमेराने एक सेल्फी घेतला आहे. या सेल्फीत आदित्य L1 वर लावण्यात आलेले दोन पेलोड्स VELC आणि SUIT व्यवस्थितरीत्या दिसत आहेत. यासोबतच आदित्य L1 पृथ्वी आणि चंद्राचा एक व्हिडिओ देखील बनवला आहे. हा व्हिडिओ 4 सप्टेंबरचा आहे. एकूणच आदित्य L1ने ही माहिती शेअर करून त्याच्यावर लावण्यात आलेली उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याची माहिती दिली.

18 सप्टेंबरपर्यंत आदित्य-L1 पृथ्वीभोवती चार वेळा आपली कक्षा बदलणार आहे. एकदा आदित्य L1 लँग्रेज पॉईंट 1 ला पोहोचला. मग तो दररोज 1440 फोटो पाठवेल. हे फोटो आदित्यमध्ये लावण्यात आलेल्या विसीबल लाईन इमिशन कोरोनाग्राफ (VELC) द्वारे काढली जाणार आहे. या फोटोंद्वारे सूर्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करता येणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime News : शिक्षिकेने हद्दच केली! Instagram फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्वतःचेच अश्लील व्हिडीओ…

आदित्य L1 हे मिशन पाच वर्षासाठी बनवले गेले आहे. पण जर आदित्य अवकाशात व्यवस्थित राहिला तर तो 10 ते 15 वर्ष काम करू शकतो. या दरम्यान तो सुर्या संबंधित महत्वपुर्ण माहिती शेअर करू शकतो. पण यासाठी आधी आदित्य L1ला पोहोचणे आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT