Hoarding Accident : भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरले, पण भुजबळांनी केली 'सुटका'

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

शितल म्हात्रे आणि राम कदम यांनी केलेल्या आरोपानंतर छगन भुजबळ यांनी एक विधान केले.
उद्धव ठाकरे, शितल म्हात्रे, राम कदम, छगन भुजबळ.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर भाजप-शिवसेनेने घेरले

point

छगन भुजबळ यांच्या विधानाने ठाकरेंची सुटका

point

भुजबळ ठाकरेंवरील आरोपांवर काय बोलले?

Chhagan Bhujbal Uddhav Thackeray : मुंबईतील घाटकोपर परिसरात सोमवारी (१३ मे) भले मोठे होर्डिंग कोसळले. यात तब्बल १४ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर होर्डिंग ज्या कंपनीनं हे होर्डिंग लावलेलं आहे. त्या कंपनीचा मालक भावेश भिंडेंचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो दाखवत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले. या घटनेसाठी थेट उद्धव ठाकरेंनाच जबाबदार ठरवलं. पण, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक विधान करत ठाकरेंची या आरोपांतून सुटका केली. भाजप-सेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपावर भुजबळ काय म्हणाले, समजून घ्या. (Chhagan Bhujbal said that Uddhav Thackeray has no connection with the Ghatkopar hoarding incident in mumbai)

ADVERTISEMENT

घाटकोपरमधील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला लावण्यात आलेले होर्डिंग १३ मे रोजी वादळी वाऱ्यामुळे कोसळले. यात १४ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली. 

भावेश भिंडेंवरून उद्धव ठाकरेंना घेरलं

इंगो मीडिया कंपनीचे हे होर्डिंग होते. त्याचे मालक भावेश भिंडे आहे. याच भावेश भिंडेवरून भाजप आणि शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना कात्रीत पकडलं. भाजप-शिवसेनेचे नेते काय म्हणाले ते वाचा...

हे वाचलं का?

आमदार राम कदम म्हणाले, "14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. मनाला चीड आणणारे हे चित्र. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते, हे या चित्रावरून स्पष्ट होते."

हेही वाचा >> "दबाव होता... तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते" 

"टक्केवारीसाठी कोविड काळातील खिचडीचोर... कफनचोर... आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?", असा संतप्त सवाल राम कदम यांनी केला. 

ADVERTISEMENT

शिंदेंच्या शिवसेनेने काय म्हटलंय?

या दुर्घटनेवरून शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी एक पोस्ट करत सवाल केला. "घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेतला आरोपी भावेश भिंडेची उबाठाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंतसोबत नेमकी कशावर चर्चा सुरु आहे?? या भिंडेने आमदार सुनील राऊत आणि उद्धटरावांच्या उपस्थितीत शिल्लक गटात प्रवेश केलेला", असे म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपने राज ठाकरेंना का सोबत घेतले? मोदींनीच दिले उत्तर 

"निष्पाप मुंबईकरांचे प्राण घेणाऱ्या या अनधिकृत होर्डिंग्जसाठी किती टक्केवारी मिळाली उद्धटराव ? उद्धटराव, या निष्पाप मुंबईकरांच्या रक्ताने तुमचे हात माखले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेसाठी तुम्ही ही तेवढेच दोषी आहात", असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे म्हणाल्या. 

छगन भुजबळांनी ठाकरेंना दिली क्लिनचीट?

उद्धव ठाकरेंसोबतचे भावेश भिंडेंचे फोटो शेअर विरोधकांनी खिंडीत पकडले. त्यावर छगन भुजबळांनी असं उत्तर दिलं की भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 

भुजबळ म्हणाले, "काय हे? आता सरकार आमचं आहे. महापालिका सुद्धा आमचीच आहे सध्या. म्हणजे सरकारच्या हातात. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?", असा सवाल त्यांनी केला.

हेही वाचा >> 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

पुढे ते म्हणाले की, "असे अनेक जे लोक असतात... हे जे व्यापारी असतात, धंदेवाले. ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात, पुष्पगुच्छ घेऊन. मिठाई घेऊन. फोटो काढतात. हे होर्डिंग्ज जे आहेत, ते नियमाप्रमाणे आहेत की नाही, याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महापालिका असेल, या सगळ्यांनी याची चौकशी केली पाहिजे. केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे. आम्ही कारवाई करणार आहोत. अरे बेकायदेशीर आहे, सरळ सरळ मग वेळ कशाला काढताय तुम्ही? लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग तुम्ही धाव घेणार सगळे?", असा सवाल करत छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT