Kangana Ranaut : 7 किलो सोने, 60 किलो चांदी...करोडोची मालकीण आहे बॉलिवूडची क्वीन
kangana Ranaut Net Worth : कंगनाच्या जंगम मालमत्तेचा तपशील पाहिला तर, तिच्या नावावर एक किंवा दोन नाही तर 50 एलआयसी पॉलिसी आहेत आणि या सर्व पॉलिसी एकाच तारखेला, 4 जून 2008 रोजी खरेदी केल्या गेल्या होत्या. याशिवाय तिने शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे.c
ADVERTISEMENT

kangana Ranaut Net Worth : बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत हीने अभिनय क्षेत्रात यशस्वी कामगिरी केली आहे. त्यानंतर आता ती राजकारणात तीचं नशीब आजमावायचा प्रयत्न करते. भाजपकडून तिला लोकसभेचे तिकीट मिळालं असून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातून ती निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीसाठी तिने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिने तिच्या संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे.त्यामुळे कंगना रणौतकडे (kangana Ranaut) नेमकी किती संपत्ती (Net Worth) आहे? हे जाणून घेऊयात. (kangana ranaut files nomination from himachal pradesh mandi lok saba 2024 net worth car collection loksabha 2024)
कंगनाची संपत्ती किती?
कंगना रणौतचा जन्म 23 मार्च 1987 साली हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला आहे. तिच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर ती बारावीपर्यंतच शिकली आहे. तसेच निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार कंगना रणौत 90 कोटींहून अधिकच्या संपत्तीची मालकीण आहे.
कंगनाकडे सध्या 2 लाख रूपये रोकड आहे. आणि अनेक बँक खाते, शेअर्स, डिंबेचर्स आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसह मिळून तिची एकूण संपत्ती 28 कोटी, 73 लाख, 44 हजार 239 रूपये आहे.तर तिची स्थावर मालमत्ता 62 कोटी,92 लाख 87 हजार रुपये आहे. तर कर्जाबद्दल बोलायचं झाल तर तिच्यावर 17 कोटी, 38 लाख रूपये आहे.
हे ही वाचा : भाजप-शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरले, पण भुजबळांनी केली 'सुटका'
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, कंगना रणौतकडे 6 किलो 700 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत, ज्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे 60 किलो चांदी आहे, ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. याशिवाय तिच्याकडे कोट्यवधींचे हिऱ्यांचे दागिनेही आहेत, ज्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे