झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड आणली अन् वृद्ध भावालाच संपवलं; भावा-भावांमध्ये रक्तरंजित थरार, नेमका वाद काय?
Crime News : कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरुन झालेल्या वादात एका ६५ वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. चुलत भावानेच कुऱ्हाडीचा घाव घालून वृद्धाची निर्घृण हत्या केली आहे. नातेवाईकांमध्ये झाडावरुन झालेला वादाने हिंसक वळण घेतलं. यामध्ये बाली नावाच्या ६५ वर्षीय वृद्धाचा खून झाला. त्यांना वाचवण्यासाठी आलेले त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड आणली अन् वृद्ध भावालाच संपवलं
भावा-भावांमध्ये रक्तरंजित थरार, नेमका वाद काय?
Crime News : कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरुन झालेल्या वादात एका 65 वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. चुलत भावानेच कुऱ्हाडीचा घाव घालून वृद्धाची निर्घृण हत्या केली आहे. नातेवाईकांमध्ये झाडावरुन झालेला वादाने हिंसक वळण घेतलं. यामध्ये बली नावाच्या 65 वर्षीय वृद्धाचा खून झाला. त्यांना वाचवण्यासाठी आलेले त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : रीलमध्ये सुसाईड सीन दाखवण्यासाठी गेली, पण डाव अंगलट आला; 4 वर्षांच्या चिमुकलीसमोर महिलेचा जीव गेला
कडुनिंबाच्या झाडावरुन पेटला वाद
या वादाची ठिणगी आदल्या दिवशीच पडली होती. मृत बाली यांचा मुलगा अक्रम हुसेन याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा चुलत भाऊ फकरु आणि त्याच्या मुलांनी त्यांच्या मालकीच्या कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या. या कारणावरुन दोन्ही कुटुंबात आधीच तणाव निर्माण झाला होता. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा फकरु आपल्या मुलांसह आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह झाड कापण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचला. जेव्हा बाली यांनी या कृत्याला विरोध केला, तेव्हा आरोपी फकरुने रागाच्या भरात त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला.
कुऱ्हाडीचा घाव अन् एका क्षणात मृत्यू
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, फकरुने बाली यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वर्मी घाव घातले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. वडिलांना वाचवण्यासाठी अक्रम हुसेन मध्यस्थी करायला गेला असता, आरोपींनी त्यालाही सोडले नाही आणि त्याच्यावरही जीवघेणा हल्ला केला. या हाणामारीत कुटुंबातील तीन महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली असून त्या जखमी झाल्या आहेत. जखमी बाली यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.










