Mumbai Weather Update Alert: काळाकुट्ट अंधार, धुळीचे लोट; मुंबईत पावसाने घातला धुमाकूळ! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Weather Update Today: मुंबई : महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक 2024 साठीचे (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यासर्वात चर्चा होतेय ती मुंबईत (Mumbai) पडलेल्या मुसळधार पावसाची... मुंबई आणि आसपासच्या शहरातील हवामानात अचानक बदल झाला. धुळीचे लोट हवेत पसरले आणि वाऱ्यासह पावसाने दणका दिला. पण यामुळे कडाक्याच्या उन्हात नागरिकांना दिलासा मिळाला. (mumbai weather update alert unseasonal rain heavy dust storm news

2024 मध्ये मुंबईत पडलेला हा पहिलाच पाऊस आहे. उन्हाळ्याचा मोसम असताना हा पाऊस पडला आहे. मुंबईत प्रचंड उकाडा होता तापमान 35 अंशांच्या जवळ गेले होते. अशात पाऊस बरसल्याने येत्या काही दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वादळाचा प्रभाव मध्य मुंबईतील बदलापूर, भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही दिसून आला आहे.

हेही वाचा : मी सांगितलं होतं, 'ते' वायनाडमधून पळून जातील आणि... : मोदी

IMD ने दिला होता येलो अलर्ट...

हवामान विभागाने (IMD) मुंबईच्या काही भागात येलो अलर्टही दिला होता. त्यामुळे मुसळधार पाऊस, वादळ येण्याचा अंदाज होता. हवामान खात्याने खासकरून ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी केला होता. मुंबईत 14 मे 2024 पर्यंत म्हणजेच मंगळवारपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Lok Sabha : 'अहमदनगरमध्ये पैशांची बरसात, पाकीट वाटली...'

मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत

वादळामुळे मुंबईची मेट्रो सेवा देखील विस्कळीत झाली आहे. एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरचा पत्रा कोसळला. पत्रा कोसळल्याने मेट्रो सेवा थांबवण्यात आली. तसंच अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.  


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT