Maharashtra Rain : मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेलाही फटका, उद्या 'या' ट्रेन असणार रद्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra rain alert due to heavy these train cancelled tommorrow pune to mumbai trains cancelled
राज्यात आज पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला

point

मुंबई लोकलसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आज रद्द

point

रेल्वेरुळावर पाणी साचल्याने 6 एक्सप्रेस रद्द

Railway Cancelled : राज्यात आज पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला आहे. मुंबई लोकलसह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे गुरूवारी 60 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वेरुळावर पाणी साचल्याने 6 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. उद्या शुक्रवारी देखील असाच मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत? हे जाणून घेऊयात. (maharashtra rain alert due to heavy these train cancelled tommorrow pune to mumbai trains cancelled)

ADVERTISEMENT

'या' एक्सप्रेस रद्द 

हवामान विभागाने उद्या शुक्रवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शुक्रवारी धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये मुंबई-पुणे दरम्यान धावणारी  (१२१२७) इंटरसिटी एक्सप्रेस (१२१२४) डेक्कन क्वीन, (१२१२६) प्रगती एक्स्प्रेसचा समावेश आहे. गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात रेल्वेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांना पर्यायी गाड्यांची माहिती देण्याची व्यवस्था या कक्षाच्या माध्यमातून केली जात आहे.

हे ही वाचा : Viral Video: पत्नी, मुलीशी बोलला अन्... इंजिनिअरने थेट अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी

सगळ्या नद्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोणत्याही नदीतून पाण्याचा प्रवाह वाढल्यास तिथली रेल्वे सेवा ठप्प केली जाईल. वांगणी आणि बदलापूरमध्ये टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम तेथील परीस्थितीवर लक्ष ठेवून आहे. याबाबतची माहिती देखील कंट्रोल रूमला देण्यात येत आहे.त्यानुसार ट्रेन रद्द करायच्या आहेत की संख्या वाढवायची आहेत, याबबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील धनराज निला यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

तसेच मुसळधार पावसामुळे लोको पायलटना वेग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कारण वारा आणि पावसामुळे सिग्नल दिसण्यास अडचणी येतात. तसेच आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आवश्यकतेनुसार आम्ही सुरक्षिततेच्या उपायांसाठी पावले उचलू,असे स्वप्नील निला यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Anil Deshmukh : फडणवीसांना देशमुखांचे थेट चॅलेंज, ''माझ्याविरोधातील व्हिडिओ क्लिप्स जगजाहीर कराव्या''

दरम्यान मुसळधार पावसामुळे लोकल प्रवाशांपाठोपाठ लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ही हाल झाले. बदलापूर-वांगणी दरम्यान उल्हास नदीचे पाणी रुळांवर आले होते. यामुळे वेगमर्यादेसह गाड्या धावत्या ठेवण्यात आल्या. १२१२३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पुणे डेक्कन क्वीन, १२१२५ सीएसएमटी-पुणे प्रगती आणि १२१२८ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी या तीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे सुरक्षित वेगमर्यादेसह मेल-एक्स्प्रेस सुरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT