Kurla Accident: चालक संजय मोरेने 'हत्यारा'सारखा केला बसचा वापर?, पोलिसांचा खळबळजनक दावा...

मुंबई तक

Kurla Accident Sanjay More: कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी पोलिसांनी बस चालक संजय मोरे याच्याविरोधात कोर्टात एक खळबळजनक दावा केला आहे.

ADVERTISEMENT

चालक संजय मोरेने 'हत्यारा'सारखा  केला बसचा वापर?
चालक संजय मोरेने 'हत्यारा'सारखा केला बसचा वापर?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी खळबळजनक दावा

point

चालक संजय मोरेने 'हत्यारा'सारखा केल्याचा पोलिसांना संशय

point

कोर्टाने चालक संजय मोरेला सुनावली पोलीस कोठडी

मुंबई: मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री झालेल्या बस अपघाताने सर्वच जण हादरून गेले आहेत. या अपघातात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 42 जण जखमी झाले आहेत. आता मंगळवारी या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, या घटनेत चालकाने बसचा वापर 'हत्यार' म्हणून केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही याचा तपास करण्याची गरज आहे.

नेमकी घटना काय?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात सहभागी असलेल्या बसचा चालक संजय मोरे याने हे कृत्य करण्यासाठी मुद्दाम बसचा शस्त्र म्हणून वापर केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तपासात सुसूत्रता आणण्यासाठी न्यायालयाने ५४ वर्षीय बसचालक संजय मोरे याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा>> Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? धक्कादायक माहिती उघड

ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुंबईतील कुर्ला परिसरात घडली. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) द्वारे चालवल्या जाणाऱ्या या बसने दाट लोकवस्तीच्या परिसरात अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली.

घटनेनंतर लगेचच बस चालक संजय मोरे याला घटनास्थळाहून ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 (हत्येचे प्रमाण नसून दोषी मनुष्यवध) आणि 110 (हत्येचे प्रमाण नसून दोषी हत्या करण्याचा प्रयत्न) तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp