Premanand Maharaj : 'फिगर मेन्टेन करणं सोडा, हिंदू महिलांनो तुम्ही 4 मुलं...', प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

Mahamandaleshwar Swami Premanand Maharaj : उज्जैन येथील बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेदरम्यान प्रेमानंद महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमानंद महाराजांनी ''हिंदु महिलांनी फिटनेस मेंटेन करणे सोडा आणि 4-4 मुलं जन्माला घाला'', असा सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

 महामंडलेश्वर प्रेमानंद महाराज यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.
mahamandaleshwar swami premanand maharaj controversial statement on hindu women ujjain uttar pradesh news
google news

बातम्या हायलाइट

point

हिंदू महिला आपली फिगर मेंटेन करायच्या मागे लागल्या आहेत

point

इतर समाजातील महिलांना 8-8 मुले होतायत

point

हिंदू महिलांनो 4-4 मुलं जन्माला घाला

Mahamandaleshwar Swami Premanand Maharaj : ''हिंदू महिला आपली फिगर मेंटेन करायच्या मागे लागल्या आहेत, आणि इतर समाजातील लोकांना 8-8 मुले होतायत'', असं वादग्रस्त व्यक्तव्य महामंडलेश्वर प्रेमानंद महाराज यांनी केले आहे. त्यासोबत हिंदु महिलांनो 4-4 मुलं जन्माला घाला, असा सल्ला देखील प्रेमानंद महाराज (Swami Premanand Maharaj) यांनी महिलांना दिला आहे. प्रेमानंद महाराजांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (mahamandaleshwar swami premanand maharaja controversial statement on hindu women ujjain uttar pradesh news) 

उज्जैन येथील बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेदरम्यान प्रेमानंद महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना प्रेमानंद महाराजांनी ''हिंदू महिलांनी फिटनेस मेंटेन करणे सोडा आणि 4-4 मुलं जन्माला घाला'', असा सल्ला दिला आहे. 

''हिंदू समाजातील स्त्रिया 1 ते 2 अपत्ये होण्यास कचरतात, तर इतर समाजातील लोकं 8-8 मुले जन्माला घालत आहेत. त्यामुळे हिंदू महिलांनी आपली फिटनेस मेंटेन करण्यापेक्षा सनातन धर्म आणि देशासाठी काहीतरी केले पाहिजे. सनातन संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महिलांनी प्रत्येकी चार मुलांना जन्म देण्याची गरज आहे'',असे प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना शिंदे सरकारचं आणखी मोठं गिफ्ट, काय मिळणार मोफत?

विशेष म्हणजे जर तुम्ही 2 मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला आहे आणि तरी 3 मुलं झाली तरी काळजी करण्याची गरज नाही, कारण आम्ही तुमच्या तिसऱ्या अपत्याची काळजी घेऊ, असे देखील प्रेमानंद महाराज यांनी कथेदरम्यान म्हटले आहे. 

हे वाचलं का?