Exclusive Interview: 'मी सांगितलं होतं, वायनाडमधून पळून जातील आणि...', PM मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
PM Modi Exclusive Interview : राहुल गांधींच्या दाव्यांवर PM मोदींनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. तसंच महागाईपासून ते रोजगारापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राहुल गांधींच्या दाव्यांवर PM मोदींचं सडेतोड उत्तर!
त्यांच्या मनात ना देश, ना समाज- PM मोदी
'काँग्रेसकडून सैन्याला बदनाम करण्याचे काम'
PM Modi on Congress Rahul Gandhi : लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर आजतकने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची खास मुलाखत घेतली. महागाईपासून ते रोजगारापर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर पंतप्रधान मोदींशी यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'निवडणुकीच्या या केंद्रस्थानी 140 कोटी देशवासी आहेत. हीच लोकशाहीची सर्वात मोठी मागणी आहे. एकप्रकारे शेतकरी, महिला, तरुण आणि पहिल्यांदाच मतदान करणारी तरूणाई मोठा प्रभाव निर्माण करत आहेत. तसंच सकारात्मक आणि निर्णायक मतदान करत आहेत. तीन टप्प्यातील मतदानानंतर, मी स्पष्टपणे सांगू शकतो की '400 पार' ही फक्त घोषणा नाही, ते प्रत्यक्षात दिसत आहे. पहिल्या तीन टप्प्यामध्येच हे स्पष्ट झालं आहे. प्रत्येकजण यापुढे मतदान करेल आणि भाजप-एनडीएचे मजबूत सरकार बनवेल. (pm narendra modi exclusive interview on aajtak he said many things about rahul gandhi and congress)
ADVERTISEMENT
राहुल गांधींच्या दाव्यांवर PM मोदींचं सडेतोड उत्तर!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आतापर्यंत ते म्हणत होते की भाजप 400 चा आकडा पार करू शकणार नाही. त्यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. आम्हाला वाटते की आम्ही 400 पार करू. जोपर्यंत पंतप्रधान होण्याचा प्रश्न आहे, त्यांची 2013, 2014 आणि 2019 ची भाषणं ऐका. त्यांचे आणि माझे दावे देखील पाहा. काँग्रेसचा सर्वात मोठा नेता यावेळी निवडणूक लढवणार नाही, असं मी आधीच म्हणालो होतो. ते खरं ठरलं आणि ते राज्यसभेतून सभागृहात पोहोचले. मी सांगितले होतं की ते वायनाडमधून पळून जातील आणि मतदानानंतर दुसरी जागा शोधतील.'
हेही वाचा : Devendra Fadnavis Exclusive : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार का?
त्यांच्या मनात ना देश, ना समाज- PM मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'त्यांच्यात अमेठीतून निवडणूक लढवण्याची ताकद नाही. मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते खरं ठरलं आहे. ते म्हणतात की मी बोललो तर भूकंप येईल. सभागृहात तर भूकंप झाला नाही. त्यांच्या मनात एकच आहे की चहा विक्रेत्याचा मुलगा पंतप्रधान कसा होऊ शकतो? ही व्यक्ती तिसऱ्यांदा पंतप्रधान झाली तर, नेहरूंच्या बरोबरीने असेल आणि इंदिराजींचे नावही राहणार नाही, हेही त्यांच्या मनात आहे. ते प्रत्येक गोष्टीत कुटुंब पाहतात. त्यांच्या कुटुंबापुढे काहीच असलं नाही पाहिजे. या देशात अशी कोणतीही घटना घडली नाही पाहिजे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणला अपमानित व्हावं लागेल. त्यांच्या मनात ना देश असतो ना समाज.'
हे वाचलं का?
हेही वाचा : अंधारेंचा व्हिडिओ दाखवून ठाकरेंवर टीका; राज ठाकरे कडाडले!
'काँग्रेसकडून सैन्याला बदनाम करण्याचे काम'
सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी म्हणाले, 'काँग्रेसचं माइंड ओळखा. ज्यांनी या देशाच्या लष्करप्रमुखाला गल्लीतला गुंड म्हटलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सैन्याला कमकुवत करण्याचे काम केले. मला वाटतं, 1962 च्या युद्धात देशाची झालेली दुर्दशा आणि नेहरूजींवर लागलेला अपयशाचा मोठा कलंक, तेव्हापासून काँग्रेसच्या मनात ही भावना आहे की नेहरूजी सैन्यामुळे बदनाम झाले. तेव्हापासून त्यांच्या मनात सैन्याविषयी द्वेष आहे. तो राग अजूनही दिसून येतो. नेहरूजींच्या 1962 च्या अपयशाच्या ओझ्याखाली हे कुटुंब दबले गेले आहे.' असं पंतप्रधान मोदी स्पष्ट म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT