Devendra Fadnavis Exclusive : उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार का? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

साहिल जोशी

ADVERTISEMENT

devendra fadnavis reaction on udhhav thackeray allaince lok sabha election 2024 sharad pawar ncp
मानसोपचारतज्ज्ञाची यांनी (ठाकरे) मदत घेतली पाहिजे.
social share
google news

Devendra Fadnavis Exclusive : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचे संबंध ताणले गेले आहेत. असे असले तरी भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा नेहमी सुरु असते. यावर आता राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ठाकरेंशी जुळवून घेणे कदापी शक्य नसल्याचे आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या प्रकारची भाषा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देशाच्या पंतप्रधानांविषयी वापरतात, ती भाषा पाहता जुळवून घेणार नाही, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले आहे. (devendra fadnavis reaction on udhhav thackeray allaince lok sabha election 2024 sharad pawar) ncp 

ADVERTISEMENT

मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती होणार का? याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. राजकीय मतभेद असतील तर जुळवून घेतले जाऊ शकते. पण व्यक्तिगत मतभेत असल्यास तिथे जुळवून कसे घेणार? असा सवाल करत फडणवीसांनी उदाहरण सांगितलं. 

हे ही वाचा : अंधारेंचा व्हिडिओ दाखवून ठाकरेंवर टीका; राज ठाकरे कडाडले!

नितीश कुमारांनी आमच्यावर टीका केली,पण ज्याप्रमाणे व्यक्तिगत टीका उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट करतो, अशी कधी नितीश कुमारांनी टीका केलेली आम्ही पाहिली नाही. राजकीय टीका करतो हे साहजिक आहे. टीका केल्याने कुणी आपला शत्रू होत नाही. पण कुठल्या स्तराची तुम्ही टीका करताय. मानसोपचारतज्ज्ञाची यांनी (ठाकरे) मदत घेतली पाहिजे.अशाप्रकारची भाषा एखाद्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधानांना करतो. अशी भाषा केल्यावर काय जुळवून घेणार? ठाकरेशी जुळवून घेणे कदापी शक्य होणार नाही,  असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना का दिली? फडणवीसांचा अखेर खुलासा

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT