Devendra Fadnavis Exclusive : ठाण्याची जागा एकनाथ शिंदेंना का दिली? फडणवीसांचा अखेर खुलासा

साहिल जोशी

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 why bjp give thane seat to eknath shinde naresh mhaske devendra fadnavis disclose reason
ठाणे आम्हाला 100 टक्के हवी होती. जरी ती शिवसेना लढत असली तरी.
social share
google news

Devendra Fadnavis Exclusive : महायुतीत ठाण्याची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे. नरेश म्हस्के हे ठाण्याचे लोकसभेचे उमेदवार आहेत. मात्र या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्ष पेटला होता. कारण  भाजपने देखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. त्यामुळे ठाण्याचा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिंदेंना मिळाली होती. पण ठाण्याची ही जागा आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना का दिली? यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या जागेबाबत मोठा खुलासा केला आहे. यावेळी फडणवीस जागावाटपावर म्हणाले की, आम्ही हत्ती काढून टाकला होता आणि शेपूट अडकवून ठेवली होती. 90 टक्के पेपर आम्ही सोडवला आणि 10 टक्के बाकी होता. 10 टक्के पेपर शेवटचा असल्याने त्याच्याबाबत घाई वाटत नव्हती. पण ही खरी गोष्ट आहे, त्या जागेला उशीर झाला होता. पण यावर एकाच बैठकीत तोडगा निघाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha Election BJP : 'अबकी बार 400 पार' भाजपवरचं झालं बुमरँग!

'ठाणे आम्हाला 100 टक्के हवी होती. जरी ती शिवसेना लढत असली तरी, कारण ती ओरिजनल आमची जागा होती. आनंद दिघेंनी ती जागा बाळासाहेबांकडून मागून घेतली होती. आणि आता आनंद दिघेंचेच सहकारी हे राज्याचे प्रमुख असताना त्यांच्या हातातून ही जागा निसटणे, हा त्यांच्यासाठी (शिंदे)  अडचणीचा विषय होता. त्यामुळे हा मुद्दा ज्यावेळेस त्यांनी मांडला. त्यावेळेस आम्ही त्यांना ठाण्याची जागा सोडली', असा खुलासा फडणवीस यांनी केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'माझं आजही मतं आहे. भाजप त्या ठिकाणी मजबूत आहे. आमचे चार आमदार आहेत. तीन महानगरपालिकांपैकी दोन महापालिकेत 2/3  मॅजोरीटी आमची आहे. पण हेही खरं आहे. आपल्या मित्रपक्षाला नाराज करून आपण एखादी जागा घेऊन आघाडी चालवू शकत नाही', असे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. 

हे ही वाचा : "...मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही?", आव्हाडांचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

    follow whatsapp

    ADVERTISEMENT