Maharashtra Weather : राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस, निसर्गाचा मोठा खेळ

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने प्रामुख्याने कोरडं ते उष्णतेच्या हवामानाचा अंदाज राहील अशी शक्यता वर्तवली. तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारी उन्हाचा चटका बसेल असा अंदाज आहे. जाणून घेऊया 22 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता

point

दुपारी उन्हाचा चटका बसेल असा अंदाज

point

22 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज

Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने प्रामुख्याने कोरडं ते उष्णतेच्या हवामानाचा अंदाज राहील अशी शक्यता वर्तवली. राज्यातील काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज दिसून येण्याची शक्यता आहे. तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारी उन्हाचा चटका बसेल असा अंदाज आहे. जाणून घेऊया 22 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

हे ही वाचा : पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य

कोकण : 

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गात हवामान कोरडे आणि उष्ण राहील. या विभागात एकूण आर्द्रता अधिक जाणवल्यास उकाड्यात वाढ होऊ शकते. आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र : 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात कमाल तापमान 32 ते 36 अंश जाणवेल, तर किमान तापमान हे 18 ते 22 अंश राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा : 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत तापमान सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

हे वाचलं का?