प्रेमप्रकरणातून तरुणाने रस्त्याच्या मधोमध स्कार्फने गळफास घेतला, मृतदेह मांडीवर घेऊन तरुणी ढसाढसा रडली

मुंबई तक

Crime News : प्रेमप्रकरणातून तरुणाने रस्त्याच्या मधोमध प्रेयसीच्या स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. प्रियकर हा ई-रिक्षा चालक असून शिव सैनी असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित असलेली तरुणी हे चित्र बघून ती व्यथित झाली. तिने प्रियकराचा मृतदेह मांडीवर ठेवला आणि रडू लागली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रागाच्या भरात मैत्रिणीचा स्कार्फ घेत गळफास घेतला

point

प्रेमप्रकरणातून नेमकं काय घडलं?

Crime News : राजस्थानच्या अलवर शहरातील स्कीम नंबर 4 परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाने रस्त्याच्या मधोमध प्रेयसीच्या स्कार्फने गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. प्रियकर हा ई-रिक्षा चालक असून शिव सैनी असे त्याचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित असलेली तरुणी हे चित्र बघून ती व्यथित झाली. तिने प्रियकराचा मृतदेह मांडीवर ठेवला आणि रडू लागली. या घटनेनं घटनास्थळावरून ये-जा करणारे लोक थक्क झाले. 

हे ही वाचा : 'VSR कंपनीला कोण वाचवतंय...', रोहित पवारांनी 'त्या' केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, मोदी-शाहांकडेही मोठी मागणी

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, शिवा त्याच्या मैत्रिणीसोबत ई-रिक्षातून शेजारच्या परिसरात पोहोचली. दारूवरून दोघांमध्ये मोठा वाद झाला, हा इतका वाढला की शिवाने रागाच्या भरात तरुणीचे मंगळसूत्र तोडून स्वत:ला संपवलं. 

रागाच्या भरात मैत्रिणीचा स्कार्फ घेत गळफास घेतला

प्रत्यक्षदर्शींसह पोलिसांच्या तपासानुसार, शिवाने ओरडून सांगितले जर तू माझी होणार नसशील तर तू दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाहीत. रागात त्याने त्याच्या मैत्रिणीचा स्कार्फ घेतला, ई-रिक्षाभोवती बांधून गळफास घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती. 

डॉक्टरांनी शिवाला मृत घोषित केले

पोलिसांच्या उपस्थितीत, मृतदेह ई-रिक्षातून खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. तपासणीनंतर रुग्णालयातील, डॉक्टरांनी शिवाला मृत घोषित केले. या घटनेनं तरुणाला मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp