बीड : माजलगावच्या लॉजमधील 'त्या' खोलीत दुर्गंधी पसरली होती, दरवाजा उघडताच नको तेच... पुढे काय घडलं?

मुंबई तक

Beed Crime : बीड शहरातील माजलगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एक संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे वृत्त आहे. हा खून आहे की आत्महत्या याचा तपास सुरु आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी उघडकीस आल्याचे वृत्त आहे. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला ती खोली क्रमांक. 205 होती.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीड शहरातील माजलगावात धक्कादायक प्रकार

point

लॉजमध्ये संशयास्पद मृतदेह

Beed Crime : बीड शहरातील माजलगावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील व्यंकटेश लॉजमध्ये एक संशयास्पद मृतदेह आढळून आल्याचे वृत्त आहे. हा खून आहे की आत्महत्या याचा तपास सुरु आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला, ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला ती खोली क्रमांक. 205 होती. खोली बुक करणाऱ्याचे नाव  कृष्णा डाके (राहणार ता. माजलगाव, जि. बीड) असे होते. याने 15 फेब्रुवारी रोजी खोली बुक केली होती.  

हे ही वाचा : पुणे रेल्वे स्थानकावर चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, काही तासांत आरोपी गजाआड

लॉजच्या खोलीतून दुर्गंधी, दरवाजा उघडताच मृतदेह

संबंधित खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज व्यवस्थापनाने तपास केला. 20 फेब्रुवारी रोजी खोलीचा दरवाजा हा आतून बंद होता. दरवाजा उघडताच पाहणी केली असता, कृष्णा डोके यांचा मृतदेह रुममध्ये आढळून आला होता. प्राथमिक तपासातून माहिती समोर आली की, गेली तीन ते चार दिवसांपासून मृतदेह खोलीतच असल्याचे आढळून आला होता. 

आत्महत्या की हत्या? 

संबंधित घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर पंचनामा सुरु केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासातून आत्महत्येनं मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे, तरीही याबाबत नेमकं कारण समोर आलं नाही. 

हे ही वाचा : पुण्यातून परतलेल्या जोडप्याचा किरकोळ कारणावरून वाद; पत्नीने फाशी घेतली, पतीनेही संपवलं आयुष्य

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून येणाऱ्या अहवालातून मृत्यूचे खरं कारण समोर येईल. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

हे वाचलं का?

    follow whatsapp