Ghatkopar Hoarding Accident : 14 मुंबईकरांचा गेला जीव, कोणावर दाखल झाला गुन्हा?
Mumbai Ghatkopar News : सोमवारी सायंकाळी मुंबईतील वातावरणात अचानक बदल झाला आणि काळेकुट्ट ढग दाटून आल्यानंतर धुळीचे वादळ आणि पाऊस सुरू झाला. या वादळामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील रेल्वे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग पडले. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 74 हून अधिक जण जखमी झाले.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
परवानगीशिवाय होर्डिंग लावलं असल्याची मुंबई महापालिकेची माहिती
मुंबई महापालिकेची होर्डिंग्ज लावणाऱ्या एजन्सीला नोटीस
पोलिसांनी कंपनीविरुद्ध दाखल केला FIR
Mumbai hoarding collapse : घाटकोपर : मुंबईत सोमवारी (13 मे) अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. धुळीच्या वादळासह प्रचंड वेगाने वारे वाहत होते. यावेळी घाटकोपर परिसरात एक मोठी घटना घडली. तुफान सुटलेल्या वाऱ्यामुळे मोठे होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळले. या घटनेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 74 हून अधिक जण जखमी झाले. 15 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या होर्डिंगचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदले गेले असले तरी आता हे होर्डिंग महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (14 Mumbaikars lost their lives in Ghatkopar Hoarding collapsed accident fir registered against the company )
ADVERTISEMENT
सोमवारी सायंकाळी मुंबईतील वातावरणात अचानक बदल झाला आणि काळेकुट्ट ढग दाटून आल्यानंतर धुळीचे वादळ आणि पाऊस सुरू झाला. या वादळामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील रेल्वे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग पडले, त्याखाली मोठ्या प्रमाणात लोक अडकले असल्याची माहिती सुरूवातीला सांगण्यात आली. घटनास्थळी आरडाओरडा झाला. तत्काळ पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेतले. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत.
हेही वाचा : Mumbai Tak Chavadi : '...तर मी दोन पक्ष, एक कुटुंबं फोडलं असतं'
माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा पेट्रोल पंपाजवळ शंभरहून अधिक लोक उपस्थित होते. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफच्या मदतीने मदत बचाव कार्य सुरू करण्यात आले, जे रात्रभर सुरू होते. पहाटे 3 वाजेपर्यंत होर्डिंगमध्ये अडकलेल्या एकूण 86 जणांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय ३१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
हे वाचलं का?
परवानगीशिवाय होर्डिंग लावलं असल्याची मुंबई महापालिकेची माहिती
या घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक निवेदन जारी करून हे होर्डिंग त्यांच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याचे म्हटले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी आणखी चार होर्डिंग्ज होते. पण, त्या सर्वांना एसीपी (प्रशासन)आणि पोलीस आयुक्त (रेल्वे मुंबई) यांच्याकडून मान्यता मिळाली होती. तसंच कोसळेले हे होर्डिंग्ज लावण्यापूर्वी एजन्सी/रेल्वे यांनी महापालिकेकडून कोणतीही परवानगी/एनओसी घेतलेली नाही.
हेही वाचा : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
मुंबई महापालिकेची होर्डिंग्ज लावणाऱ्या एजन्सीला नोटीस
मुंबई महापालिकेच्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, ते जास्तीत जास्त 40x40 चौरस फूट आकाराच्या होर्डिंगला परवानगी देतात. मात्र, कोसळलेले होर्डिंग बेकायदेशीर लावण्यात आले होते आणि त्याचा आकार 120x120 चौरस फूट होता. म्हणजेच हे होर्डिंग अंदाजे 15000 स्क्वेअर फुटांचे होते.
ADVERTISEMENT
पोलिसांनी कंपनीविरुद्ध दाखल केला FIR
पोलिसांनी होर्डिंग मॅन्युफॅक्चरिंग एजन्सी मेसर्स इगो मीडिया आणि तिच्या मालकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. होर्डिंग मालक भावेश भिंडे आणि इतरांविरुद्ध कलम 304, 338, 337 अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भाजपसोबत युती करणार?, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले...
घाटकोपरमधील या अपघातावर शोक व्यक्त करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिले, 'मी शोकग्रस्त कुटुंबीयांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. मी जखमी लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते आणि मदत आणि बचाव कार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते.'
होर्डिंगचे ऑडिट केले जाईल- मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाटकोपर परिसरात घटनेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. जिथे त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या. लोकांना वाचवणे हे आमचे प्राधान्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. मुंबईतील अशा सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT