Mumbai Tak Chavadi : '...तर मी दोन पक्ष, एक कुटुंबं फोडलं असतं', आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

aditya thackeray criticize devendra fadnavis cm eknath shinde mumbai tak chavadi lok sabha election 2024
उद्धव साहेबांवर इतकं प्रेम असताना तुम्ही पक्ष का फोडलात?
social share
google news

Aditya Thackeray, Mumbai Tak Chavadi : राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंना ग्रुम करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महिन्याभरापूर्वीच केला होता. या ग्रुमवरून आता आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.  जर मी ग्रुम झालो असतो तर मी दोन पक्ष फोडले असते आणि एक परिवार फोडून इकडे आलो असतो, असा चिमटा आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) काढला आहे. (aditya thackeray criticize devendra fadnavis cm eknath shinde mumbai tak chavadi lok sabha election 2024) 

मुंबई तकच्या चावडीवर आज शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मुद्यावर दिलखुलास उत्तरे दिली. ''उद्धव ठाकरे माझे शत्रु नाही, संकट काळात त्यांच्या मदतीला मी धावून जाईन, उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या काळात रश्मी वहिणींकडे तब्येतीची विचारपूस करायचो,असे मोदींनी म्हटल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मला याला काही राजकीय रंग द्यायचा नाही, मोदी साहेब सिनिअर आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे. उद्धव साहेबांवर इतकं प्रेम असताना तुम्ही पक्ष का फोडलात? महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता का निर्माण केलीत? महाविकास आघाडीचं सरकार का पाडलंत? असा सवाल आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केला.

हे ही वाचा : VIDEO : आधी आमदाराने लगावली कानशिलात, नंतर मतदाराने...;

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कोणाला मुख्यमंत्री बनवायचे हा विधानसभेचा विषय झाला. पण लोकसभेवर कोणी बोलतच नाही आहे. एप्रिलपासून निवडणूक सूरू झाली आहे. आणि भाजपने 10 वर्षाच्या कार्यकाळात काय केलंय यावर काहीच बोलत नाही आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात काय केलय यावर बोलत नाही आहेत. बोलतात कशावर, यांना पुत्र प्रेम होतं, त्यांना पुत्री प्रेम होतं, त्यामुळे महाराष्ट्राला त्यांनी यात गुंतवून ठेवलं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी भाजपवर केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

पंतप्रधान आवास योजनेत कुणालाही घर मिळालंय का? 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. 
लाभार्थीच्या जाहीरातीत तर दुप्पट काय चार पट झालंय. एक शेतकरी आहेत ज्या शेतात दोन हेलिकॉप्टर जातात, त्यांचं उत्पन्न वाढल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT