VIDEO : आधी आमदाराने लगावली कानशिलात, नंतर मतदाराने...; मतदान केंद्रावर दे दणा दण!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 ysrcp mla siva kumar slaps voter clashes with party worker viral video
आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली,
social share
google news

MLA Slap Voter Video : 'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो', असं म्हणत जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन केले जाते. प्रत्येक मतदाराच्या एका एका मतावर उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असते. पण या राज्यात एक विचित्र घटना घडली आहे.एका राजकीय नेत्याने (MLA Siva kumar) थेट उमेदवाराच्याच कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  (lok sabha election 2024 ysrcp mla siva kumar slaps voter clashes with party worker viral video)

ADVERTISEMENT

आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) चौथ्या टप्प्यात 15 मतदार संघात मतदान पार पडतेय. या दरम्यान एका मतदान केंद्रावर मतदारांची खूप मोठी गर्दी जमली होती. या दरम्यान आंध्र प्रदेशच्यया तेनाली मतदार संघाचे आमदार ए. सिवा कुमार यांची मतदान केंद्रावर एन्ट्री झाली होती. यावेळी रांगेतील मतदारांपैकी एकाने आमदाराला रांगेत उभं राहून मतदान करण्यासाठी हटकलं होतं, आमदाराला याचा राग अनावर झाला आणि त्याने मतदाराला कानशिलात लगावली होती. त्यानंतर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी मतदाराला मारहाण केली होती. 

हे ही वाचा : Mumbai News : मोठी बातमी! घाटकोपरमध्ये 100 जण होर्डिंगखाली दबले?

रांगेतील मतदाराने आमदार ए. सिवा कुमार यांना रांगेत उभे राहून मतदान करण्याचे सुचवले होते. त्यामुळे आमदार संतप्त झाला. यातून दोघांमध्ये सुरूवातीला शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर आमदाराने थेट मतदाराच्या कानशिलात लगावली होती. या प्रत्युरात मतदाराने देखील आमदाराचे कानाखाली जाळ काढला होता. त्यानंतर आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मतदाराची धुलाई केली होती. 

हे वाचलं का?

या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. आणि मतदान देखील ठप्प झाले होते. धक्कादायक म्हणजे या केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त अजिबात नव्हता. दरम्यान या घटनेचा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : पंतप्रधानांच्या 'त्या' विधानावर ठाकरे प्रचंड चिडले

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT