Maharashtra Lok Sabha Election : पवार, ठाकरेंना मोदींची 'ऑफर', चार राजकीय अर्थ!

भागवत हिरेकर

Meaning of pm modi offer to sharad pawar and uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिलेल्या ऑफरचा अर्थ काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४

point

मोदींची पवार, ठाकरेंना ऑफर

point

एनडीएमध्ये सामील होण्याच्या ऑफरचा अर्थ काय?

Lok Sabha election 2024 Maharashtra : नंदुरबारमधील प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना एनडीएमध्ये सामील व्हा, असे आवाहन केले. या ऑफरने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. मोदींच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. मोदी अचानक काही बोलत नाही. त्यांच्या बोलण्यामागे काही डावपेच असतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. (Request to Sharad Pawar and Uddhav Thackeray to join NDA, what is political meaning of Modi's statement?)
 
पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये केलेल्या आवाहनाचे राजकीय अर्थ काय, हेच समजून घेऊयात...

भाजप महाराष्ट्रात अजूनही मजबूत साथीदाराच्या शोधतात?

लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकारणाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले होते की, 'येत्या काही वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील आणि ते काँग्रेसमध्ये विलीन होण्याचीही शक्यता आहे.' 

पवारांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेत शरद पवारांचा पक्ष नकली राष्ट्रवादी आणि उद्धव यांचा पक्ष नकली शिवसेना असे म्हटले होते आणि काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबत या आणि अभिमानाने तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करा, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >> "मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं", सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट 

खरं तर भाजप निवडणुकीची 5 वर्षे पुढची तयारी करत आली आहे. महाराष्ट्रात भाजपला अनेक नवे मित्रपक्ष मिळाले पण मराठा मते आपल्या बाजूने वळण्यात यश आल्याचे दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबत राज्यात अजूनही आंदोलन सुरू आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp