Maharashtra Board Class 10, 12 Exam: मुलांनो तयारीला लागा... HSC आणि SSC परीक्षा 'या' तारखेपासून होणार सुरू
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2026 साठी SSC (10वी) आणि HSC (12वी) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2026 साठी SSC (10वी) आणि HSC (12वी) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्षीही बोर्डाने परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर करून शाळा, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि परीक्षा तणाव कमी करण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे. HSCच्या लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून, त्या 18 मार्चपर्यंत चालतील. तर SSC च्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत असतील.
HSC आणि SSC परीक्षेचे वेळापत्रक
मंडळाने जाहीर केलेल्या तपशीलानुसार, HSC साठी प्रॅक्टिकल्स, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत प्रकल्प (प्रोजेक्टसह) 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान घेतले जाईल. SSC साठी प्रॅक्टिकल्स, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत प्रकल्प (प्रोजेक्टसह) 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान होईल. खालील तक्त्यात संपूर्ण वेळापत्रक दिले आहे:
परीक्षा प्रकार | प्रॅक्टिकल्स/तोंडी परीक्षा/प्रकल्प |
लेखी परीक्षा |
HSC (12 वी) | 23 जानेवारी ते 9फेब्रुवारी 2026 |
10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 हे वाचलं का? |