Ghatkoper Hoarding Collapse : भावेश भिंडेने 'त्या' होर्डिंगसाठी झाडांनाही दिलं विष, वाचा Inside Story
Ghatkoper Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी इगो मिडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे विरोधात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडेवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणात भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
ADVERTISEMENT

Ghatkoper Hoarding Collapse : दिपेश त्रिपाठी, मुंबई : मुंबईत सोमवारी आलेल्या अवकाळी पावसाने घाटकोपरमधील महाकाय होर्डिंग कोसळल्याची दुदैवी घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण जखमी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेनंतर हे होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे होर्डिंग उभारण्यासाठी आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान हे होर्डिंन (Ghatkoper Hoarding Case) नेमक्या कोणत्या कंपनीच्या मालकीचे होते आणि या कंपनीचा मालक नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात. (ghatkoper hoarding collapse 14 people death fir filled against bhavesh bhinde mumbai politics udhhav thackeray nitesh rane)
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भिंडे यांनी लोहमार्ग पोलिसांची परवानगी घेऊन हे होर्डिंग उभारले होते. तर महापालिकेच्या नियमांना धाब्याबर बसवले होते. त्यामुळे महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून हे होर्डिंग उभारण्यात आले होते.
हे ही वाचा : "भाजपला बहुमत मिळणं कठीण", चव्हाणांनी सांगितलं 'इंडिया' किती जिंकेल जागा?
विशेष म्हणजे पालिकेच्या धोरणांमध्ये 40 बाय 40 म्हणजेच 1 हजार 600 चौरस फुट होर्डिंग उभारण्याची परवानगी आहे. पण जाहिरातदार कंपनीने 120 बाय 120 म्हणजेच 14,400 चौरस फुटाचे होर्डींग उभारले होते. तसेच हे होर्डिंग उभारताना आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला होता. काही झाडे तोडण्यात आली होती. यावेळी पालिकेने कंपनीला नोटीसही बजावली होती. मात्र तरीही कंपनीने होर्डिंग उभारलं होतं.
दरम्यान या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी इगो मिडिया कंपनीचे मालक भावेश भिंडे विरोधात 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडेवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणात भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.