Narendra Dabholkar: हत्या ते निकाल... 11 वर्षात काय घडलं? वाचा Inside Story

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत 'त्या' पहाटे काय घडलं?

point

100 हून अधिक CCTV फुटेज, 8 कोटी कॉल डेटा... सुरूवातीच्या तपासात हाती काय?

point

दाभोळकर हत्येप्रकरणी किती जणांना अटक?

Narendra Dabholkar : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन सिमितीचे (अंनिस) प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. 20 ऑगस्ट 2013 रोजी घडलेल्या या प्रकरणावर आता 11 वर्षांनी निकाल देण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात 5 आरोपींपैकी इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Narendra Dabholkar Murder Case to verdict What happened in 11 years know about it in detail)

ADVERTISEMENT

नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत 'त्या' पहाटे काय घडलं?

डॉ. नरेंद्र दाभोळकर नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 रोजीही मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी सव्वासातच्या सुमारास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी एकामागून एक अशा 5 गोळ्या दाभोळकरांवर झाडल्या. ज्यामध्ये 2 गोळ्या मिसफायर झाल्या तर दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात आणि छातीला लागल्या, यासर्वात त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी राज्यात आंदोलनं झाली. 'आम्ही सारे दाभोळकर' म्हणत अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आणि समर्थक यांचा रोष वाढत होता, अशात पोलिसांनीही तपास वेगाने सुरू केला. 

100 हून अधिक CCTV फुटेज, 8 कोटी कॉल डेटा... सुरूवातीच्या तपासात हाती काय?

सुरूवातीच्या तपासात, पोलिसांनी घटनास्थळाजवळील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु त्यात धुरकट आणि अस्पष्ट दिसल्यामुळे आरोपींची ओळख पटू शकली नाही. घटना जवळून पाहणाऱ्या एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, दाभोळकरांवर हल्ला करणारे आरोपी तेथून 7756 क्रमांकाच्या दुचाकीवरून पळून गेले होते. 

हे वाचलं का?

 

हेही वाचा : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदी यांची ऑफर; जाहीरसभेत काय बोलले?

या हत्येच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी नाशिक, पुणे आणि ठाणे येथील कारागृहात बंद असलेल्या सुमारे 200 गुन्हेगार आणि गुंडांसह 1500 जणांची चौकशी केली. जवळपास 16 ठिकाणांहून 8 कोटी फोन कॉल्सचा डेटाही गोळा केला होता. साक्षीदाराने नमूद केलेल्या दुचाकी क्रमांकाशी जुळणाऱ्या सर्व दुचाकींची यादीही तयार करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही याप्रकरणी पोलिसांना कोणताही पुरावा सापडला नाही.

ADVERTISEMENT

दाभोळकर हत्येप्रकरणी किती जणांना अटक?

वर्षभरानंतर दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी 2014 रोजी पहिली अटक केली. मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन शस्त्र विक्रेत्यांना ही अटक करण्यात आली होती. पण, यासर्वात इंट्रेस्टिंग गोष्ट ही होती की, ज्या दिवशी दाभोळकर यांची हत्या झाली होती त्याच्या तीन तासांनी पोलिसांनी या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती.

ADVERTISEMENT

हेही वाचा : "दबाव होता... तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते", वायकरांनी सोडलं मौन

20 ऑगस्ट 2013 ला खंडणी प्रकरणात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2013 मध्ये त्यांना महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्याकडून 40 अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा एटीएसने केला होता. पोलिसांनी ही शस्त्रे फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवली. 

दाभोळकरांच्या हत्येत घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या नागोरी आणि खंडेलवालच्या यापैकी एक बंदुकीची मार्कींग ही दाभोलकरांच्या हत्या स्थळावरून जप्त केलेल्या काडतुसासोबत मिळती जुळती असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं. त्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.  पण, 90 दिवसातही पुणे पोलीस दोषारोपपत्र दाखल करू शकले नाहीत आणि त्यामुळे या खटल्यात काही झालं नाही. त्यानंतर कोर्टाने या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली.

पुणे पोलिसांचा तपास भरकटताना पाहून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी झाली. 10 जून 2016 रोजी म्हणजेच घटनेच्या तीन वर्षांनी सनातन संस्थेशी संबंधित तज्ज्ञ डॉ. विरेंद्रसिंह तावडेला अटक केली होती. त्यानंतर जर हत्येचा घटनाक्रम पाहायचा झाला तर, दाभोळकरांची हत्या 20 ऑगस्ट 2013 ला झाली. 16 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांची हत्या झाली. 30 ऑगस्ट 2015 रोजी कलबुर्गी यांची हत्या झाली आणि 5 सप्टेंबर 2017 ला गौरी लंकेश यांची हत्या झाली. या 4 हत्यांमध्ये एक समान सूत्र होतं ते म्हणजे जी शस्त्र वापरण्यात आली होती ती एकसारखी होती. 

हेही वाचा : Narendra dabholkar murder case : दाभोलकर हत्या प्रकरणात दोघांना जन्मठेप! तिघे निर्दोष

कर्नाटक सरकारने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी SIT स्थापन केली. SIT ने पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या अमोल काळेला लंकेश यांच्या हत्येचा सूत्रधार म्हणून अटक केली.  13 फेब्रुवारी 2019 रोजी सीबीआयने दाभोलकर हत्येप्रकरणी शरद कळसकर, सचिन अंदुरे यांच्याविरुद्ध न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 2019 मध्ये सीबीआयने विक्रम भावे नावाच्या व्यक्तीला या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून नाव दिले होते. 

तपास पुढे नेत पोलिसांनी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना अटक केली. या तिघांशिवाय विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांच्याविरुद्धही तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केले. तब्बल नऊ वर्षानंतर 15 सप्टेंबर 2021 ला दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे विशेष कोर्टानं पाचही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या, गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत, युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते.

दाभोलकर यांच्या हत्येमागे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सनातन संस्था यांच्यातील संघर्ष हे मुख्य कारण असल्याचे सीबीआयचे मत आहे. 

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा 11 वर्षानंतर निकाल जाहीर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज (10 मे) निकाल दिला. न्यायालयाने तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. दोन जणांना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वीरेंद्र तावडे हा असल्याचे आरोपपत्रात म्हटलेले आहे. पण, त्याच्याविरोधात शंका उपस्थित झाल्या. गुन्ह्यात मुख्य सहभाग असल्याचा हेतू व्यक्त होतो आहे, असे सांगत न्यायालयाने पुराव्याअभावी तावडेला निर्दोष मुक्त केले.

विरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप आहे. परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले. त्याचबरोबर विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर यांच्याविरोधात आरोप सिद्ध करू न शकल्याने न्यायालयाने त्यांनाही निर्दोष सोडले. म्हणजेच या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका झाली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT