कोकणातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुणे आणि साताऱ्यातील एकूण मान्सून परिस्थिती?

मुंबई तक

maharashtra weather : महाराष्ट्रात हवामान विभागाने 2 जुलै रोजी मान्सूनचा सविस्तर अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच इतर विश्वसनीय स्रोतांवर आधारित या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील मान्सूनचा सविस्तर अंदाज जारी

point

तापमान आणि हवामानाशी संबंधित इतर माहितींचा समावेश

Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवामान विभागाने 2 जुलै रोजी मान्सूनचा सविस्तर अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) तसेच इतर विश्वसनीय स्रोतांवर आधारित या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये प्रादेशिक हवामान, पावसाची शक्यता, तापमान आणि हवामानाशी संबंधित इतर माहितींचा यात समावेश होतो, त्याची थोडक्यात माहिती पुढे देण्यात आली आहे. 

हेही वाचा : बाप नाही हैवान! दारूच्या नशेत लेकीच्या खांद्यावर कुऱ्हाडीने सपासप वार, पत्नीलाही... नेमकं घडलं काय?

कोकण 

कोकणात 2 जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज जारी केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 100- 150 मिमी पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मान्सूनने रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे आणि पालघरमध्ये मान्सूनचा येलो अलर्ट जारी केला. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरात पावसाची शक्यता आहे. सांगली आणि कोल्हापूरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होईल असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदी, नाल्यांच्या भोवताली असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

मराठवाडा 

तसेच मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद आणि जालन्यात 50 मिमी पाऊस असेल. तसेच मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

हेही वाचा : तरुण आणि तरुणीच्या अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, नंतर बाळाला मारलं अन् हाडं बॅगेत भरून...

विदर्भ आणि खानदेश

विदर्भ आणि खानदेशात 2 जुलैला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होईल. तसेच पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  
 

हे वाचलं का?

    follow whatsapp